
तपोवन वृक्षतोडीवरून वाद पेटला
मंत्री नितेश राणेंचे वादग्रस्त विधान
सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे
नाशिकमधील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने तपोवनातील १८०० झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून नाशिकसह राज्य भरातून या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील ११५० एकर जमिनीवर साधुग्राम उभारण्यात येणार आहे. त्यासाठीच या १८०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. दरम्यान मंत्री नितेश राणेंच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान तपोवन येथील 1800 वृक्षांची तोड करण्यास पर्यावरणवादी आणि सेलिब्रिटी यांनी विरोध केला आहे. मोठे आंदोलन केले जात आहे. नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान आता यावर मंत्री नितेश राणे यांनी वादरगस्त विधान केले आहे. तपोवन मधल्या वृक्ष थोड ची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच.. ईद च्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत.. तेव्हा गप्प का ? सर्व धर्म सम भाव ? अशी पोस्ट नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणेंची पोस्ट काय?
तपोवन मधल्या वृक्ष थोड ची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच..
तपोवन मधल्या वृक्ष थोड ची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच..
ईद च्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत..
तेव्हा गप्प का ?
सर्व धर्म सम भाव ? — Nitesh Rane (@NiteshNRane) December 4, 2025
ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत.. तेव्हा गप्प का ? सर्व धर्म सम भाव ? दरम्यान नितेश राणेंच्या विधानाने नवा वाद निर्माण निर्माण होण्याची शक्यता आहे.
सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे
यंदा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून याची प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. कुंभमेळ्यासाठी तपोवनासाठी वृक्षतोडीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जोरदार वाद निर्माण झाला. वृक्ष तोडून याठिकाणी तपोवन तयार केले जाणार असल्याने पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि अनेक अभिनेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत अभिनेते आणि समाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
Tapovan Case : नाशिकच्या तपोवन वृक्षतोडी वरुन पेटलं रान! सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे
सयाजी शिंदे म्हणाले की, मी जागरूक नाशिककरांना पाठिंबा द्यायला गेलो होते. जिथे झाडं तुटतील तिथे आपण उभं राहिलं पाहिजे. उजाड माळरानाच्या ठिकाणी आम्ही झाडं लावणार. तिथे झाडं नाहीत, कारण तिथली माती चांगली नाही. तिथे कुंभ मेळा भरवला पाहिजे. निवडून दिलं म्हणजे म्हणजे सगळे अधिकार तुमच्याकडे आहेत असं नाही. सर्वसामान्य माणसाचा विचार केला पाहिजे. मोठी झाडं तोडायची आणि नवीन झाडं लावायची हे चूक आहे. काही माणसं मारायची आणि त्यांना मूल बक्षिस म्हणून द्यायचं, अस कुठे होतं का,” अशा शब्दांत सयाजी शिंदे यांनी सवाल उपस्थित केला.