मुंबई: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी संध्याकाळी पर्यटकांवर हल्ला करण्यात आला. यामध्ये 28 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताने काही धोरणात्मक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. दरम्यान या सर्व घटनेवरून मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी कॉँग्रेसला देखील डिवचले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आता यावरून मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी गांधी कुटुंब, कॉँग्रेसवर टीका केली आहे. हे काय मनमोहन सिंग किंवगांधी कुटुंबाच सरकार नाही. हे देशभक्त, राष्ट्रभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे.
पाकिस्तानचा अब्बा देखील वाकड्या नजरेने भारताकडे पाहणार नाही असा धडा त्यांना शिकवलं जाईल असे मंती नितेश राणे म्हणाले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काही महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. 2014 नंतर आपण पाकिस्तानविरुद्ध कणखर भूमिका घेतली आहे. हे काय मनमोहन सिंग किंवा गांधी कुटुंबाच सरकार नाही. पंतप्रधान मोदी पाकिस्तानला असा धडा शिकवतील की त्यांचा अब्बा पण वाकड्या नजरेने पाहणार नाही.
सिंधु जल करार तोडणे म्हणजे युद्धाची घोषणा
सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या घोषणेला पाकिस्तान पूर्णपणे नकार देतो. पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे की हा करार एक बंधनकारक आंतरराष्ट्रीय करार आहे, ज्यामध्ये एकतर्फी स्थगिती आणण्याची कोणतीही तरतूद नाही. सिंधू जल करारांतर्गत पाण्याचा प्रवाह रोखण्याचा किंवा वळवण्याचा प्रकार म्हणजेच पाकिस्तानच्या हक्कांचे उल्लंघन करण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असा इशारा पाकिस्तानने भारताला दिला आहे.
‘सिंधु जल’ कराराला दिली स्थगिती
भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या आहेत. भारताने भारत-पाकिस्तान सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच १ मे पर्यंत वाघा बॉर्डर बंद राहणार आहे. तसेच भारतामधील पाकिस्तानचे उच्चयुक्तालय बंद करण्यात येणार आहे. पाकिस्तानी नागरिकांना या पुढे भारताचा व्हिसा मिळणार नाही. जे नागरिक व्हिसा घेऊन भारतात राहिले आहेत त्यांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
Big Breaking: पहलगाम हल्ल्यावरून भारताने आवळल्या पाकच्या नाड्या; ‘सिंधु जल’ कराराला दिली स्थगिती
सरकारने घेतलेले नेमके निर्णय काय?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकार आक्रमक झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची अत्यंत महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारताने १ मे पर्यन्त अटारी वाघा बॉर्डर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.