भारताचा पाकिस्तानला मोठा दणका (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: काल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. त्यामध्ये २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.
भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळल्या आहेत. भारताने भारत-पाकिस्तान सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच १ मे पर्यंत वाघा बॉर्डर बंद राहणार आहे. तसेच भारतामधील पाकिस्तानचे उच्चयुक्तालय बंद करण्यात येणार आहे. पाकिस्तानी नागरिकांना या पुढे भारताचा व्हिसा मिळणार नाही. जे नागरिक व्हिसा घेऊन भारतात राहिले आहेत त्यांना ४८ तासांमध्ये देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सरकारने घेतलेले नेमके निर्णय काय?
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारत सरकार आक्रमक झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीसीएसची अत्यंत महत्वाची बैठक घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांमध्ये भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. भारताने १ मे पर्यन्त अटारी वाघा बॉर्डर बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सिंधु जल कराराला स्थगिती; पाकिस्तानवर काय परिणाम?
भारताने घेतलेल्या निर्णयाने पाकिस्तानची चांगलीच कोंडी होणार आहे. कारण या करारामुळेच पाकिस्तानमधील बराचसा भाग सिंचनाखाली येतो. त्यामुळे हा करार स्थगिती दिल्याने पाकिस्तानच्या कृषी, उद्योग, आर्थिक दृष्ट्या कोंडी होणार आहे.
काय आहे सिंधु जल करार?
१९६० च्या काळात भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू जल करार झाला होता. भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष अयुब खान यांच्यात हा करार झाला होता. या सिंधू नदी जल करारानुसार रवी, बियास, सतलज या नद्यांच्या पाण्यावर भारताचे नियंत्रण असेल. तसेच सिंधू नदी, चिनाब आणि झेलम या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचे नियंत्रण असेल असे या करारात ठरले होते.