Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane : दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; ‘दिव्यांग भवन’ उभारणार, मंत्री नितेश राणेंची ग्वाही

सिंधुदुर्गमध्ये आयोजित दिव्यांग कल्याण आढावा बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. जिल्ह्यात 'दिव्यांग भवन' उभारण्यासह स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  • By विवेक
Updated On: Jun 15, 2026 | 09:59 PM
दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; 'दिव्यांग भवन' उभारणार, मंत्री नितेश राणेंची ग्वाही

दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; 'दिव्यांग भवन' उभारणार, मंत्री नितेश राणेंची ग्वाही

Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि त्यांच्या हक्काच्या सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. दिव्यांगांसाठी स्वतंत्र ‘दिव्यांग भवन’ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून, स्वयंरोजगार व उद्योग-व्यवसायासाठी दिव्यांग बंधू आणि भगिनींना आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेतली जाईल. तसेच विविध शासकीय विभागांमधील दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित दिव्यांग कल्याण आढावा बैठक पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, यांच्यासह दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी आणि  विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ST Workers Protest : एसटी कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात घंटानाद; प्रलंबित मागण्यांसाठी महाआरती आंदोलन

पालकमंत्री राणे यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केवळ शासकीय योजनांची अंमलबजावणी पुरेशी नसून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होऊ शकतील अशा ‘दिव्यांग भवन’ संकल्पनेला प्राधान्य दिले जाणार आहे. या भवनातून मार्गदर्शन, प्रशिक्षण, समुपदेशन आणि विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध होईल. दिव्यांग व्यक्तींना उद्योग, व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीत दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवरील अनुशेष, विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी, रोजगाराच्या संधी आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा आढावा घेण्यात आला. दिव्यांग बांधवांना येणाऱ्या अडचणींबाबत उपस्थित प्रतिनिधींनी विविध सूचना आणि मागण्या मांडल्या. पालकमंत्री श्री. राणे यांनी संबंधित विभागांना दिव्यांगांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे निर्देश देत, त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. दिव्यांग बांधवांच्या जीवनमानात गुणात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी शासनाच्या सर्व योजनांचा प्रभावी लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.

Amravati News: वृक्षांसाठी उभे राहिलेले हात जिंकले! आराखडा तयार; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे महामार्गावरील वृक्षतोड थांबली

Web Title: Nitesh rane divyang bhavan disability welfare sindhudurg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Nitesh Rane
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय
1

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा
2

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
3

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
4

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.