Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्यातील 600 जि.प. शाळा CCTV च्या निगराणीखाली; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय

Wardha News : बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील जि.प.च्या 600 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ही यंत्रणा 100 टक्के कार्यान्वित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 08, 2026 | 02:34 PM
CCTV

CCTV

Follow Us
Follow Us:
  • वर्धा जिल्ह्यातील जि.प.च्या 600 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.
  • 2024-25 मध्ये 400 शाळांसाठी 1 कोटी 65 लाख, तर 2025-26 मध्ये 500 शाळांसाठी 2 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध.
  • विद्यार्थ्यांची सुरक्षा, शाळेत ये-जा करणाऱ्या व्यक्तींवर नजर आणि समाजकंटकांना आळा घालण्यास मदत होणार.
 

Wardha News : बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यातही जि.प.च्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला वेग आला. जिल्ह्यात जि.प.च्या ६०० शाळा असून या सर्वच शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. शिवाय ही यंत्रणा १०० टक्के कार्यान्वित असल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ४०० जि. प. शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी १ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर २०२५-२६ मध्ये आणखी ५०० शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. निधी उपलब्ध झाल्यानंतर शाळा परिसरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर देखरेख तसेच अनुचित प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही बसविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

शाळेच्या प्रवेशद्वारासह परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे शाळा परिसरातील हालचालींवर शिक्षक व प्रशासनाला लक्ष ठेवणे शक्य होत आहे. जिल्ह्यातील जि.प.च्या ६०० शाळांमध्ये सीसीटीव्हीची सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

वर्ध्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबता थांबेना; 9 महिन्यांत 107 शेतकऱ्यांची आत्महत्या

ग्रामीण शाळांतील सुरक्षा व्यवस्था झाली मजबूत

ग्रामीण भागातीलही जिल्हा परिषदेच्या शाळांत सीसीटीव्ही बसविण्यात आल्याने संबंधित शाळांमध्येही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. सीसीटीव्हीमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत झाली आहे.

समाजकंटकांच्या मनमर्जीला ब्रेक

काही समाज कंटकांकडून शाळाच्या आवारातही मद्य व इतर अमलीपदार्थ पूर्वी प्राशन केले जात होते. पण जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांच्या आवारात सीसीटीव्ही बसवण्यात आल्याने समाज कंटकांच्या मनमर्जीला आता बऱ्यापैकी ब्रेक लागल आहे.

यावर बोलताना वर्धा, शिक्षणाधिकारी (प्राथ.) सीमा पाटील म्हणाल्या, “जिल्हा परिषदेच्या ६०० शाळा आहेत. या सर्व शाळांत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्र स्थानी ठेवून सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून शाळांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासोबतच शाळा परिसरातील अनुचित प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.”

Wardha News : वर्ध्यावर जलसंकटाचं सावट! ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागवला; प्रशासनाची तयारी सुरू

Web Title: Wardha news zp school cctv camera student safety vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Education Department
  • Maharashtra Government
  • wardha
  • wardha News
  • ZP School

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी
1

Pune MPSC Student Protest : आंदोलनाला हायकोर्टाचा दणका? नागरिकाची याचिका, राज्य सरकार-पोलिसांना नोटीस, उद्या होणार सुनावणी

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
2

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग
3

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन! ‘Participate Mumbai’मुळे शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग

Wardha News : वर्ध्यावर जलसंकटाचं सावट! ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागवला; प्रशासनाची तयारी सुरू
4

Wardha News : वर्ध्यावर जलसंकटाचं सावट! ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागवला; प्रशासनाची तयारी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.