Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

Nitesh Rane visit Washim Drought Like Situation: वाशिम जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जलाशय व तलावांतील पाणीसाठा घटल्याने मत्स्य व्यवसायासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. प्रत्येक नुकसानीची नोंद घेऊन मत्स्य व्यावसायिकांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन मंत्री नीतेश राणे यांनी दिले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 07, 2026 | 07:29 PM
Nitesh Rane visit Washim

Nitesh Rane visit Washim

Follow Us
Follow Us:
  • पाणीसाठा घटला, मत्स्य व्यवसाय अडचणीत
  • नीतेश राणेंनी दिले मदतीचे आश्वासन
  • जलाशयातील गाळ काढण्यासाठी राज्यव्यापी उपक्रम

वाशिम: दुष्काळसदृश परिस्थितीत जलाशय व तलावातील पाणीसाठा कमी असून मत्स्य व्यवसायापुढे संकट निर्माण झाले आहे. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा असून त्यानुसार प्रत्येक नुकसानाची नोंद घेऊन मत्स्य व्यावसायिक बांधवांना अधिकाधिक मदत मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी आज येथे केले.

दुष्काळ सदृश स्थितीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली त्यावेळी ते बोलत होते. आ. भावना गवळी, आ. सई डहाके, आ. श्याम खोडे, आ. बाबुसिंग महाराज राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, मत्स्य व्यवसाय आयुक्त भानुदास पालव, प्रादेशिक उपायुक्त सु. वा. जांभुळे, सहाय्यक आयुक्त प्रियंका झोड आदी उपस्थित होते.

यंदा मासे उत्पादनात मोठी घट होणार

राणे म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मासे उत्पादनात मोठी घट होणार आहे. मत्स्य व्यवसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. जलाशयांमध्ये गाळ साचल्याने त्यांची क्षमता कमी होते. त्यामुळे जलाशयांमधील गाळ काढण्यासाठी राज्यव्यापी उपक्रम राबविण्यात येईल. जलाशयातील शेतीसाठी वापरता येणार आहे व जलाशये मोकळी झाल्यामुळे भविष्यात साठवण क्षमता वाढणार आहे. संबंधित यंत्रणांनी यासंबंधीचे प्रस्ताव दोन आठवड्यात शासनाकडे परिपूर्ण करून पाठवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी जलसंधारण, पाटबंधारे, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

काजळंबा व धामणी खडी तलावाची पाहणी

  • त्यांनी ग्राम काजलंबा व धामणी खडी येथील जलाशयांची पाहणी करून मत्स्य व्यावसायिक बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
  • जलाशयामध्ये पाणी नसल्याने मत्स्य व्यवसायाला अडचणी आल्या आहेत, दूसरे उपजीविकेचे साधन नाही.
  • मत्स्यबीज बोटुकली मिळत नाही, आधी अडवणी मलय व्यावसायिक बाधवानी यावेळी मांडल्या.
  • बैंकानी मच्छी व्यवसायिकांची अडवणूक करता कामा नये. दुष्काळाच्या स्थितीत अधिक संवेदनशीलतेने कुठलीही तांत्रिक कारणे पुढे न करता अधिकाधिक सहकार्य करावे, त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयांनी योजनांचा लाभ त्यांना मिळवून द्यावा.
  • मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत अनेक विविध लाभलागू आहेत त्यासाठी अधिकाधिक मासेमार बांधवांनी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे

Web Title: Washim nitesh rane fishermen assistance drought fisheries news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 07:29 PM

Topics:  

  • Nitesh Rane
  • Washim news
  • Water Shortage

संबंधित बातम्या

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात
1

राज्यात पाणी कपातीचे मोठं संकट; 16 ऑक्टोबरपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10 टक्के कपात

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी
2

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी

Nitesh Rane : आदित्य ठाकरे विदेशात गेले? दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; नितेश राणेंच्या गंभीर दाव्याने राजकारणात खळबळ
3

Nitesh Rane : आदित्य ठाकरे विदेशात गेले? दिशा सालियान प्रकरण पुन्हा चर्चेत; नितेश राणेंच्या गंभीर दाव्याने राजकारणात खळबळ

Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान
4

Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.