Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitesh Rane : गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावं, नितेश राणेंचे आदेश

केंद्र सरकारने सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राने देशातील पहिले जहाज बांधणी धोरण तयार केले आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 25, 2025 | 06:36 PM
गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावं, नितेश राणेंचे आदेश

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावं, नितेश राणेंचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रात जहाज बांधणी आणि बंदरे क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध असून या क्षेत्रातील गुंतवणूक प्रोत्साहनासाठी राज्याने स्वतःचे जहाज बांधणी धोरण तयार केले आहे. गुंतवणूकदारानी या धोरणाचा लाभ घ्यावा आणि राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. ताज सांताक्रूझ येथे आयोजित तिसऱ्या जागतिक बंदरे आणि जहाज परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बेल्जियमचे वाणिज्य दूत फ्रँक गिरकेन्स, नॉर्वेचे वाणिज्य दूत मोनिका नागेलागार्ड यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Maharashtra Rain Alert: पुढील काही तास सांभाळून! राज्यावर वरूणराजा कोपणार; चिंता वाढली

केंद्र सरकारने सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची घोषणा केली असल्याचे सांगून मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्राने देशातील पहिले जहाज बांधणी धोरण तयार केले आहे. या धोरणामुळे राज्य जहाज बांधणी व बंदर विकास क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल. जहाज बांधणी आणि सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. पर्यावरणीय परवाने मिळवण्यासाठी राज्याची स्वतःची एमसीझेडई (MCZE) कमिटी आहे. तिच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सुलभतेने परवाने मिळतील. उद्योगस्नेही धोरणामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगल्या सुविधा मिळतील. वेळेत प्रकल्प कार्यान्वित व्हावेत यासाठीही शासन आवश्यक पावले उचलणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले .

मंत्री नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्रात जागतिक स्तरावरील जलमार्ग विकसित केले जातील व जलवाहतुकीला प्राधान्य देण्यात येईल. यामुळे वेळ व इंधनाची बचत होऊन अर्थव्यवस्था सक्षम होईल. मुंबईमध्ये लवकरच वॉटर मेट्रो सुरू होणार असून त्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होईल. मुंबई व कोकण भाग जलवाहतुकीने जोडला जाणार असून रो-रो सेवा सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. जहाज बांधणी उद्योगात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात असून शासन गुंतवणूक व दररचनेच्या बाबतीत सहकार्य करेल, असेही मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

बंदर व जहाज वाहतूक विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी या परिषदेत बोलताना सांगितले की, बंदरे आणि जहाज वाहतूक क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देते. महाराष्ट्रातील लहान बंदरांतून मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक सुरू असून या क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. वाढवण प्रकल्पात राज्याचा सहभाग आहे. क्लस्टर विकास मॉडेलवर भर देऊन या उद्योगाचा विस्तार करण्यात येणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राने सागरी विकासासाठी ठोस दिशा दिली असून उद्योगस्नेही धोरण, पायाभूत सुविधा आणि केंद्र व राज्य शासनाचा पाठिंबा यामुळे राज्य भविष्यात जहाजबांधणी व सागरी वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र होणार आहे.

Maharashtra Heavy rains: अतिवृष्टी, पूरस्थिती अन् मृत्यू…:मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

Web Title: Nitesh rane on investors should contribute to the development of the state shipbuilding industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 06:36 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Amit Shah : बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे, अमित शाह यांचे आवाहन
1

Amit Shah : बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे, अमित शाह यांचे आवाहन

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र
2

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

ST Workers Protest : ऐन दिवाळीत एसटीचं चाक थांबणार! एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, काय आहेत मागण्या?
3

ST Workers Protest : ऐन दिवाळीत एसटीचं चाक थांबणार! एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा, काय आहेत मागण्या?

Maharashtra Rain Update: नागरिकांना सतर्कतेचा इशारा! मुंबईसह ‘या’ 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट
4

Maharashtra Rain Update: नागरिकांना सतर्कतेचा इशारा! मुंबईसह ‘या’ 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.