राज्यात पावसाचा जोर वाढणार (फोटो- ani)
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
राज्य सरकारचे नागरिकांना सावधानतेचा इशारा
मराठवाड्यात शेतीचे झाले मोठे नुकसान
Maharashtra rain Update: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याने पुनः एकदा चिंता वाढली आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
राज्यात सर्वत्र पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, चंद्रपूर, यवतमाळ जिल्हयानसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सर्व नागरिकांना सवधानतेचा इशारा दिला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस राज्यात होईल.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस पुण्यात पाऊस आणि गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. एकीकडे मान्सूनचा राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरु झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र मान्सून सक्रिय आहे. २७ आणि २८ सप्टेंबर रोजी मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र, पुणे-मुंबई आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान, पुण्यात बुधवारी दिवसभरात कमाल 29.6 आणि किमान 20.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
मराठवाड्यात चिंता वाढणार
मराठवाड्यात आसमानी संकट अजून कायम असणार आहे. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील नदीकाठी असणाऱ्या गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.