Nitin Gadkari's new scheme allows you to cross toll plazas for just Rs 15
मुंबई : वाहतूक आणि प्रवास सुलभ आणि अपघातमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे अनेक प्रभावशाली आणि नाविन्यपूर्ण योजना घेऊन येत असतात. आता टोल संदर्भात एक महत्त्वाची योजना समोर आली आहे. देशातील टोल प्रणाली ही स्वस्त होण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहे. आता जाहीर करण्यात आलेल्या योजनेंतर्गत केवळ 15 रुपयांमध्ये टोल क्रोस करता येणार आहे. यामुळे वाहन चालकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात येत असलेल्या या योजनेमध्ये विशेषतः कार, जीप आणि व्हॅन या सारख्या खाजगी वाहनांचा समावेश असेल. याद्वारे फक्त 15 रुपयांमध्ये टोल प्लाझा ओलांडता येणार आहे. पण यासाठी काही स्टेप्स फॉलो करणे गरजेचे असणार आहे. या बातमीच्या माध्यमातून ही सर्व प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कधीपासून सुरू होणार योजना?
18 जून रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली होती. यामध्ये त्यांनी देशात वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याबाबत घोषणा केली. यामुळे वाहन चालकांचे पैसे तर वाचतीलच, पण टोल प्लाझातून बाहेर पडणेही सोपे होईल. या नवीन फास्टॅगच्या अंमलबजावणीनंतर वाहनचालकांना फक्त १५ रुपयांत टोल प्लाझावर जाता येईल. ही वार्षिक पास योजना १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल.
१५ रुपयांत टोल प्लाझावरुन जाता येईल कसे?
रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वार्षिक फास्टॅगबद्दल बोलताना सांगितले की, फक्त १५ रुपयांत टोल प्लाझावर जाता येते. त्यांनी सांगितले होते की या फास्टॅग पासची किंमत ३००० रुपये आहे, याद्वारे तुम्ही २०० फेऱ्या करू शकता. एका फेऱ्याचा अर्थ एक फेऱ्याचा म्हणजेच एक टोल प्लाझावर जाण्याचा आहे. त्यानुसार, तुम्हाला प्रति टोल १५ रुपये द्यावे लागतील.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जर तुम्ही सामान्यतः कोणत्याही टोलवर ५० रुपये भरत असाल, तर २०० टोल प्लाझानुसार तुम्हाला १०,००० रुपये द्यावे लागतील, परंतु वार्षिक फास्टॅग पासद्वारे तुम्ही ७००० रुपये वाचवू शकता.
या फास्टॅगचा काय फायदा ?
सर्वसाधारणपणे, तुम्ही कोणताही फास्टॅग वापरता, तो तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करावा लागतो. दुसरीकडे, जर आपण वार्षिक फास्टॅगबद्दल बोललो तर तो फक्त एकदाच रिचार्ज करावा लागतो. त्याचा कालावधी संपल्यानंतर, तुम्हाला तो पुन्हा रिन्यू करावा लागेल. एकदा पैसे भरल्यानंतर, लोकांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. १५ ऑगस्ट २०२५ पासून देशभरात तो लागू केला जाईल.