
८ वर्षांत नागपूर जिल्ह्यात शुद्ध नैसर्गिक वायू (पीएनजी) नेटवर्क वाढवायचे उद्दिष्ट
बुटीबोरी येथील कान्होलीबारा येथे एचसीजीच्या सीजीएस कम मदर स्टेशनच्या उद्घाटन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पीएनजी नियामक मंडळाचे सचिव अंजन कुमार मिश्रा आणि एचसीजी ग्रुपचे एमडी राहुल चोपडा प्रामुख्याने उपस्थित होते. भारत पेट्रोल आणि डिझेलवर आधारित वाहतूक व्यवस्थेपासून वेगाने दूर जात आहे. देशाला केवळ आयात केलेल्या इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्याची गरज नाही तर स्वच्छ, परवडणारे आणि शाश्वत पर्याय स्वीकारण्याचीही गरज आहे. सरकार मोठ्या प्रमाणात फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. अशी इंजिने इथेनॉल, सीएनजी, जैवइंधन आणि पेट्रोलच्या मिश्रणावर काम करेल. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. इथेनॉल उत्पादनामुळे शेती-आधारित अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि इंधन आयात खर्च कमी होईल, असेही गडकरी म्हणाले.
देश ८७ टक्के ऊर्जा आयात करतो. ज्याची किंमत २३ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळे केवळ आर्थिक समस्याच नव्हे तर वायूप्रदूषणही होते. म्हणूनच, सरकारने पर्याय शोधण्याची योजना आखली आहे. ट्रॅक्टर कंपन्या फ्लेक्स इंजिन तंत्रज्ञान वेगाने विकसित करीत आहे. १०० टक्के इथेनॉल आणि सीएनजीवर चालणारे फ्लेक्स इंजिन ट्रॅक्टर आता तयार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त इंधन मिळेल. पर्यायी इंधनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आर्थिक मदत देत असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यात बांधकाम उपकरणांना वित्तपुरवठा करणाऱ्या आणि पर्यायी इंधन किंवा जैवइंधनावर चालणारी उपकरणे निवडणाऱ्यांना ५ टक्के अनुदान मिळेल, असेही ते म्हणाले.
जिल्ह्यातील वाहने, औद्योगिक प्रकल्प आणि घरगुती वापरासाठी पीएनजी पुरविण्याची जबाबदारी आमची आहे. हा प्रकल्प ८ वर्षांसाठी आहे. त्यानुसार हे काम वेगवेगळ्या टप्प्यात पूर्ण केले जाईल. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात २७ सीएनजी स्टेशन कार्यरत आहे. याद्वारे चारचाकी वाहनांना सीएनजी पुरवठा केला जात आहे. एका वर्षात ही संख्या ५० ने वाढविण्याचे ध्येय आहे. ८ वर्षांत ५०० स्टेशन उघडण्याचे लक्ष्य आहे. आम्ही औद्योगिक प्रकल्पांमध्ये नैसर्गिक वायूच्या वापरावर भर देत आहोत. यासाठी बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातील ४ कंपन्यांना नैसर्गिक वायू पुरवण्यासाठी आवश्यक कनेक्टिव्हिटी स्थापित केली. पुरवठा लवकरच सुरू होईल.
SBI News: सुट्ट्यांचा परिणाम शेअर बाजारावर, ‘या’ टॉप कंपन्यांना ३५ हजार कोटींचा फटका
याशिवाय, आणखी २७ कंपन्यांचे प्रस्ताव सुरू आहेत. मौदामध्ये हल्दीराम आणि हिंडाल्कोदेखील पाईपलाइनमध्ये आहेत. मिहान आणि चिंचभवन भागातील उद्योग, रुग्णालये, रेस्टॉरंट्स आणि घरगुती ग्राहकांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक नैसर्गिक वायू मिळेल. जिल्ह्यातील उद्योगांना २४ तास पाईपद्वारे नैसर्गिक वायुपुरवठा केला जाईल, कान्होलीबारा है सुरुवातीचे ठिकाण असून येथून पीएनजीचा पुरवठा केला जाईल, असे एचसीजीचे अध्यक्ष कपिल चोपडा आणि अध्यक्ष (ऑपरेशन्स) दीपक सावंत यांनी सांगितले.