Chief Minister: काळजीवाहू मुख्यमंत्री 'या' खात्यांवर ठाम; फडणवीस-शिंदेंच्या बैठकीत तोडगा नाहीच, आज काय होणार?
Maharashtra Government: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस उलटून गेले आहेत. महायुतीला जनतेने संपूर्ण बहुमत दिले असेल तरी अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री कोण होणार हेच अजून स्पष्ट झालेले नाही. भाजपचा मुख्यमंत्री होणार असला तरी चेहरा कोण असणार हे अजूनही स्पष्ट नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नाव अंतिम झाल्याचे समजते आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. खातेवाटप संदर्भात काल दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते आहे. मात्र कालच्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे समजते आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन सरकारमध्ये जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याला समर्थन देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र शिवसेनेकडे गृहखाते, नगरविकास खाते आणि सार्वजनिक बांधकाम खाते असावे अशी एकनाथ शिंदे यांची मागणी असल्याचे समजते आहे. यावर कालच्या बैठकीत तोडगा निघाला नसल्याचे समजते आहे. मात्र याबाबत पुन्हा एकदा बैठक घेऊन तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.
आज महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शिवसेनेने आपल्या गटनेत्याची निवड केली आहे. आज भाजपची बैठक होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपच्या गटनेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना गटनेते केले जाऊ शकते. तसेच मुख्यमंत्री भाजपचा होणार हे स्पष्ट झाले असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समोर येत आहे. मात्र आज चेहरा स्पष्ट होण्याची शक्यता आहे. भाजपचा गटनेता निवडण्यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक आज राज्यात येणार आहेत.
दरम्यान आज दुपारी महायुतीचे नेते राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. राज्यपालांकडे आज सत्ता स्थापन करण्याबाबत पत्र दिले जाऊ शकते. विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज होते. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात गृहमंत्रीपद आणि नगरविकास खात्याची मागणी केली होती. पण कोणत्याही परिस्थितीत भाजप शिंदे गटाला गृहमंत्रीपद देण्यास तयार नव्हते.साताऱ्यातील त्यांच्या गावी निघून गेले. तिथेच एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली आणि ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या.
हेही वाचा: Devendra Fadnavis: ‘वर्षा’वर घडामोडींना वेग; फडणवीस शिंदेंच्या भेटीसाठी दाखल, काय निर्णय होणार?
एकनाथ शिंदे त्यानंतर काल सांयकाळी महायुतीची बैठक होणार होती. पण शिंदेंच्या प्रकृती अस्वस्थामुळे ही बैठकही रद्द करण्यात आली. आज मुंबईतील ज्युपिटर रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यानंतरअखेर आज खातेवाटपाच्या चर्चांसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून हालचाली सुरू झाल्या, उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन भेट घेतल्यानंतर शिंदे आणि भाजप यांच्यातील चर्चेची दारे पुन्हा उघडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आज दिवसभरात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट होऊ शकते.