Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Loan Waiver: ८ वर्षांत ६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारची विधानसभेत कबुली

दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल एक अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ७५ हजार रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 12, 2025 | 03:19 PM
Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana,

Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana,

Follow Us
Close
Follow Us:
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय
  • वर्षांपासून ६ लाख ५६ हजार शेतकरी वंचित
  • मुख्यमंत्री सहायता निधीत १ अब्जाची मदत जमा, मिळाले ७५ हजार
Nagpur Assembly Session:   छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला असला तरी अजूनही गेल्या ८ वर्षांपासून ६ लाख ५६ हजार शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ देण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पात्र शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी ५,९७५.५१ कोटी रुपयांची गरज आहे. मात्र पुरवणी मागण्यांमधून अवघ्या ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (Farmers News) 

विधानसभेमध्ये लेखी उत्तरामधून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही स्पष्ट कबुली दिली. अंमलबजावणीसाठी ५.९७५.५१ कोटींची गरजः शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी गुरुवारी तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी लेखी उत्तरामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही आकडेवारी सादर केली. उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशालाच हरताळ फासला असल्याचे चित्र आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी ५,९७५.५१ कोटी रुपयांची गरज आहे.

Saugat Roy E-cigarette : संसदेच्या आवाराला काही मर्यादा आहे का नाही? TMC खासदारने थेट फुंकली E – Cigarette

मुख्यमंत्री सहायता निधीत १ अब्जाची मदत जमा, मिळाले ७५ हजार

दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये तब्बल एक अब्ज रुपयांची मदत जमा झाली. मात्र, राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना केवळ ७५ हजार रुपये मिळाल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते वैभव कोकाट यांनी आरटीआय टाकून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा झालेली रक्कम आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झालेली मदत या संदर्भात विचारणा केली होती. यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (Farmer Loan Waiver)

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक

३५५ कोटी ५५ लाख रक्कम तिजोरीतच पडून

दरम्यान, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मदत पॅकेज मोठ्या अपेक्षेने जाहीर झाले. मात्र, या मदतयोजनेतील लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना सुद्धा गंभीर तांत्रिक अडथळे उभे राहिल्याचे समोर आले आहे. ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक व आधार माहितीतील तफावत, तसेच पोर्टलवरील तांत्रिक त्रुटींमुळे तब्बल ५ लाख ४२ हजार १४१ शेतकऱ्यांना घोषित मदत मिळालेली नाही. परिणामी या शेतकऱ्यांच्या नावावरची एकूण ३५५ कोटी ५५ लाख रुपयांची रक्कम तिजोरीतच पडून आहे.

७५,००० रुपयांचीच मिळाली शेतकऱ्यांना मदत

१ अब्ज रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा

 

Web Title: No loan waiver benefit for 6 lakh farmers in 8 years government admits in assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • Farmers News
  • Maharashtra Winter Session

संबंधित बातम्या

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले 44000 कोटींचे पॅकेज; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती
1

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिले 44000 कोटींचे पॅकेज; अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती

‘Ladki Bahin Yojana बंद होणार….’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितले स्पष्टचं
2

‘Ladki Bahin Yojana बंद होणार….’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितले स्पष्टचं

Kisan Agri Expo: शेतकऱ्यांसाठी कृषी उत्सव! मोशीत किसान कृषी प्रदर्शनाला सुरुवात; ३० एकरावर ६०० कंपन्यांची गर्दी
3

Kisan Agri Expo: शेतकऱ्यांसाठी कृषी उत्सव! मोशीत किसान कृषी प्रदर्शनाला सुरुवात; ३० एकरावर ६०० कंपन्यांची गर्दी

Winter Session: सुरक्षेचे नियम धाब्यावर, मंत्री-आमदारांनाच शिस्तीची गरज; पोलिसांच्या गोपनीय अहवालात नेमकं काय?
4

Winter Session: सुरक्षेचे नियम धाब्यावर, मंत्री-आमदारांनाच शिस्तीची गरज; पोलिसांच्या गोपनीय अहवालात नेमकं काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.