कोल्हापूर, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात जाहीरनाम्यामध्ये घोषणा केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यासंदर्भात सातत्याने विरोधकांकडून टीका होत असताना उपमुख्यमंत्री, अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर अक्षरशः हात झटकले. त्यामुळे कर्जमाफीवरून पुन्हा एकदा राज्यामध्ये रणकंदन होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात या संदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिले आहे का? मी तरी दिलेले नाही, असे म्हणत एक प्रकारे या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान, लाडकी बहीण हप्त्याच्या संदर्भाने अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, लाडक्या बहिणींबाबत सरकार सकारात्मक असून, एप्रिलला हप्ताही त्यांना मिळेल, असे आश्वस्त केले
पाकिस्तान खबरदार! राफेल, मिराजचा आक्रमक युद्धाभ्यास; थेट UP च्या ‘गंगा एक्सप्रेस-वे’ वर केले…
मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीचे खोटी आश्वासने दिल्याने दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पहलगाम हल्यातील अतिरेक्यापेक्षाही क्रूर झाले असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. माळसोन्ना ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या शेतकरी आत्महत्या आक्रोश पदयात्रेत त्यांनी सडकून टीका केली. महायुती सरकारने निवडणुकीत दिलेले संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्वासन पाळून तातडीने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी निवेदनाद्वारे या काढलेल्या मोर्चादरम्यान करण्यात आली.
केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चाललेला आहे. देशातील ६.५० लाख हेक्टर त राज्यातील ३.५९ लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेली आहे हे विदारक चित्र केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा आरसा आहे. उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबविण्यात येणारे आयात-निर्यात धोरण, नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, पिकविमा कंपन्यांची नफेखोरी, दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी यासारखी संकटांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
पाक क्रिकेट खेळाडूने पाकिस्तनी आर्मीवर साधला निशाणा! म्हणाला – सैन्याने चालवलेले घाणेरडे…