Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिली एक वर्षाची मुदतवाढ; प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया

अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय बंधनकारक असल्याचे सांगत या कालावधीत सर्व चालकांनी मराठी शिकावी, असे स्पष्ट केले.

  • By विवेक
Updated On: Aug 27, 2026 | 09:34 PM
Pratap Sarnaik

Pratap Sarnaik

Follow Us
Follow Us:
  • अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक वर्षाची मुदतवाढ.
  • एक वर्षानंतर आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही, असे प्रताप सरनाईक यांचे संकेत.
  • आतापर्यंत 1 लाख 60 हजार अमराठी चालकांनी जुजबी मराठी शिकल्याची एकनाथ शिंदे यांची माहिती.
मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या निर्णयानंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भूमिका स्पष्ट केली असून, मुख्यमंत्र्यांनी दिलेली मुदतवाढ आपल्यासाठी बंधनकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या एका वर्षात चालकांनी मराठी शिकणे अपेक्षित असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मराठी शिकण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. या कालावधीत मराठी न शिकल्यामुळे संबंधित चालकांवर कारवाई केली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

‘महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आवश्यक’

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्रात राहायचे असेल आणि येथे व्यवसाय करायचा असेल तर प्रत्येकाने किमान जुजबी मराठी शिकणे आवश्यक आहे. पूर्वी नोटीस दिल्यानंतर एका महिन्यात मराठी शिकण्याची तरतूद होती. मराठी बोलता न आल्यास पुढील तीन महिन्यांपर्यंत परवाना रद्द करण्याची प्रक्रिया लागू होऊ शकत होती.

अमराठी टॅक्सी, रिक्षाचालकांना मोठा दिलासा ! मुख्यमंत्री फडणवीसांकडूनच मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ, वर्षभर कारवाई नाही…

मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः एक वर्षाची मुदत दिल्याने त्या निर्णयाचे पालन केले जाईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले. या एक वर्षाच्या कालावधीत चालकांनी जुजबी मराठी शिकावी आणि त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

1989 पासूनचा नियम, 36 वर्षांनंतर आणखी एक वर्ष

मराठी शिकण्याचा आणि बोलण्याचा नियम 1989 पासून अस्तित्वात असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. आतापर्यंत 36 वर्षे या नियमाच्या अंमलबजावणीसाठी प्रतीक्षा केली आहे. त्यामुळे आणखी एक वर्षाची मुदत मिळाली तरी त्यात काही गैर नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आयुक्तांच्या दौऱ्यापूर्वीच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई, भांडुप स्टेशन परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अर्बन डिझायनरची मदत

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत 1 लाख 60 हजार अमराठी चालकांनी जुजबी मराठी शिकल्याची माहिती दिली. त्यापैकी सुमारे 20 ते 30 हजार चालकांनी कांदिवली येथे आयोजित कार्यक्रमात मराठी भाषा शिकल्याचे प्रमाणपत्र घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीचा व्यवहारातील वापर वाढावा आणि अन्य भाषिकांमध्येही मराठी भाषेचा प्रसार व्हावा, यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

Web Title: Non marathi auto drivers marathi learning one year extension pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

अमराठी टॅक्सी, रिक्षाचालकांना मोठा दिलासा ! मुख्यमंत्री फडणवीसांकडूनच मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ, वर्षभर कारवाई नाही…
1

अमराठी टॅक्सी, रिक्षाचालकांना मोठा दिलासा ! मुख्यमंत्री फडणवीसांकडूनच मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ, वर्षभर कारवाई नाही…

महाराष्ट्रातील 20 लाख शालेय विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा; 1 लाख मोफत चष्मे देणार, सरकारचा मोठा उपक्रम
2

महाराष्ट्रातील 20 लाख शालेय विद्यार्थ्यांना मिळणार दर्जेदार नेत्र आरोग्य सेवा; 1 लाख मोफत चष्मे देणार, सरकारचा मोठा उपक्रम

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
3

‘रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
4

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.