
Pratap Sarnaik on Eknath Shinde
दसरा मेळाव्यानिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही शिवसेनेची तोफ धडाडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क येथे होणार असून शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा नेस्को सेंटर येथे पार पडणार आहे. अश्यातच शिवसेना शिंदे गटाच्या गोटातून नवी माहिती मिळत आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या तीन बड्या नेत्यांनी मोठे विधान केले असून ‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार’ असे विधान केले आहे. (Eknath Shinde)
एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा शिंदे गटातील नेते उघडपणे बोलून दाखवत आहेत. आमदार किशोर दराडे यांच्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनीही याच मुद्द्यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना जोर आला आहे.
प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं. सध्या संख्याबळ कमी असल्यामुळे शिंदे उपमुख्यमंत्री आहेत; मात्र येणाऱ्या काळात संख्याबळ वाढवून त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सरनाईक म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे शिंदे गटाच्या भविष्यातील राजकीय रणनीतीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Devendra Fadnavis : दहा हजार मते बाद, तर पदवी कोणी दिली? सांगलीत फडणवीसांचा शिक्षक-पदवीधरांना टोला
किशोर दराडे यांनीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही सर्वांची इच्छा असल्याचं म्हटलं होतं.एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणं हे आमदारांच्या हातात आहे, असं ते यावेळी म्हणाले.
दुसरीकडे, गुलाबराव पाटील यांनीदेखील शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, ही प्रत्येक आमदाराची भावना असल्याचं सांगितलं. एकाच दिवशी तीन नेत्यांनी अशा प्रकारची विधानं केल्याने या मागणीमागे नेमकी कोणती राजकीय गणितं आहेत, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना सरनाईक यांनी, शिंदेंच्या आदेशानंतर आपण पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्याचं सांगितलं. तसंच, शिंदे त्या वेळी बाहेर असल्याचा दावा करत विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला.
जितेंद्र आव्हाड यांना वारंवार धमक्या मिळत असल्याच्या मुद्द्यावरही सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. या धमक्यांची चौकशी झाली पाहिजे आणि गरज पडल्यास आव्हाड यांची सुरक्षा वाढवली पाहिजे, असं ते म्हणाले.
एकंदरीत, शिंदे गटातील नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या विधानांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता या वक्तव्यांवर महायुतीत पुढे काय घडणार आणि पुढे कोणती राजकीय समीकरणं जुळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार
Ans: प्रताप सरनाईक यांनी येत्या काळात संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं.
Ans: प्रताप सरनाईक, किशोर दराडे आणि गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.
Ans: सध्या याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. शिंदे गटातील नेत्यांनी व्यक्त केलेली इच्छा आणि प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपदाचा निर्णय या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.