मुंबई : जाण्यापूर्वी वर्षावर भेटून गेलो होतो. आम्ही त्यांच्याविरोधात आहे का? आम्हाला आनंद होत नाही? आम्ही हळूहळू लांब गेलो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी राजीनाम्या (Resign) दिल्यानंतर दीपक केसरकर माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे (NCP) लोक जवळचे झाले. मुख्यमंत्रीपदामुळे कामे वाढली होती. मी एकट्याची भूमिका मांडत नाही. आम्हाला बिलकूल आनंद होत नाही. सगळ्यांशी चर्चा करुन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे केसरकर म्हणाले.
आम्ही अडीच वर्षांपूर्वी औरंगाबादचे नामांतर (Aurangabad Naming) करु शकलो नाही. आमच्या बंडानंतर नामांतरची घोषणा झाली, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने खूशी नाही. आम्ही गुलाल, ना पेढे वाटलेले नाही. आमच्या नेत्याला आमच्यापासून, विचारापासून लांब नेले आहे, असा आरोप दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला.
सर्व घडामोडींना संजय राऊत जबाबदार
नामांतर दबावामुळे झाले आहे. सर्व घडामोडींना संजय राऊत (Sanjay Raut) जबाबदार आहेत. सकाळी नऊ वाजता उठून राऊत मोदींविषयी वक्तव्य करायचे? कशाला असे करायचे? संजय राऊत हे ५० टक्के राष्ट्रवादीचे, ५० टक्के शिवसेनेचे आहेत. कशाचा अंत.. दगाबाजी कोणी केली. राऊतांनीच केली, असा हल्लाबोल त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीवर केला.