Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जातीचा नव्हे तर, संविधानाचा जयघोष करावा, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सत्कार

मी फिल्म मेकिंगमध्ये अपघाताने आलो. आज जे मी मांडतो, ते तुम्हा सर्वांना आवडते, याचे भारी वाटते. वर्ध्यात मी पहिल्यांदाच आलो. या जिल्हयाला ऐतिहासिक वारसा आहे. या शहरात मी पुन्हा येईल, अशी ग्वाही नागराज मंजुळे यांनी यावेळी दिली.

  • By Anjali Awari
Updated On: Apr 05, 2022 | 12:30 PM
Not the caste, but the constitution should be hailed, heartfelt greetings on behalf of various social organizations

Not the caste, but the constitution should be hailed, heartfelt greetings on behalf of various social organizations

Follow Us
Follow Us:

वर्धा : कुठल्याच जातीचा जयघोष करायला नको. जयघोषच करायचाच असेल तर संविधानाचा करावा, छत्रपती शिवाजी महाराज, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचा करावा. या महापुरुषांचा वैचारिक वारसा आम्हा सर्वांचाच आहे. हा वारसा जपतानाच त्यानुसार आपले आचरण असले पाहिजे, असे मत ‘सैराट‘फेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सामाजिक संघटनांच्या वतीने आयाजित सत्कार समारंभाला उत्तर देताना व्यक्त केले.

पुढे बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, शाळेत असताना मला मास्तरांनी विचारले होते की, तुला कोणता ऋतू आवडतो. मी उन्हाळा असे उत्तर दिले होते. माझे उत्तर ऐकून सर्वांना हसायला आले. पण उन्हाळ्याची सकाळ आणि संध्याकाळ फार सुंदर असते. उन्हात-संघर्षात तावून सलाखूनच माणसे घडतात, पुढे जातात.

[read_also content=”लग्नाच्या १२ व्या दिवशी त्या युवकावर काळाचा घाला, भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/on-the-12th-day-of-the-marriage-the-young-man-was-killed-in-a-tragic-accident-nraa-264473.html”]

मी फिल्म मेकिंगमध्ये अपघाताने आलो. आज जे मी मांडतो, ते तुम्हा सर्वांना आवडते, याचे भारी वाटते. नागपुरात मी नेहमीच येतो. वर्ध्यात मी पहिल्यांदाच आलो. या जिल्हयाला ऐतिहासिक वारसा आहे. येथे मित्रांना भेटण्याकरिता आलो. त्यात आपण सर्वांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन माझा जो सत्कार केला, तो उत्साह वाढविणारा, उभारी देणारा आहे. मी चार चित्रपटांची निर्मिती केली. त्यातील दोन व-हाडी भाषेत आहेत. या भाषेवर माझे प्रेम आहे. ‘झुंड’ हा चित्रपट नागपुरी भाषेत आहे. या चित्रपटाविषयी, त्यातील भाषेविषयी मला जगभरातून प्रतिसाद, शुभेच्छा येत आहेत. आपण सर्वांनी मला जे प्रेम दिले, ते स्मरणात राहणारे असून, या शहरात मी पुन्हा येईल, अशी ग्वाही नागराज मंजुळे यांनी यावेळी दिली.

[read_also content=”कॅनडा फ्लाईंग अकादमीचा पाच लाखांचा कर थकीत, ग्रामपंचायतीने बजावली नोटीस https://www.navarashtra.com/maharashtra/canada-flying-academy-pays-rs-5-lakh-tax-notice-issued-by-gram-panchayat-nraa-264264.html”]

पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
नागराज मंजुळे यांचा जिल्हा प्रशासनातर्फे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शाल, श्रीफळ, सुतमाला व चरखा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नागराज मंजुळे यांनी जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर सामाजिक संस्कार अधिक चांगल्या पध्दतीने रुजविणे सोपे असल्याचे ते म्हणाले. फॅन्ड्री, नाळ, सैराट या चित्रपटाच्या निर्मितीबाबतही त्यांनी बऱ्याच आठवणी सांगितल्या. नाळ या चित्रपटाचे चित्रिकरण विदर्भात झाले. येथे अनेक जिल्ह्यांत चित्रपटासाठी चांगले लोकेशन असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.

‘झुंड’साठी गल्ली-मोहल्ल्यात फिरलो
झुंड या चित्रपटाच्या निर्मितीसाठी नागपुरातील अनेक गल्ली, मोहल्यांमध्ये फिरलो. चित्रपटात अस्सल नागपुरी बाज आणण्यासाठी खूप दिवस येथील बोली भाषा, राहणीमान आदी गोष्टी आत्मसात केल्या. त्यामुळेच चित्रपटात जिवंतपणा येऊ शकल्याचे नागराज मंजुळे यांनी सांगितले.

Web Title: Not the caste but the constitution should be hailed heartfelt greetings on behalf of various social organizations nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2022 | 12:29 PM

Topics:  

  • Wardha district news
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
1

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
2

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.