Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : कमी पाण्याच्या पिकांची लागवड करा; कार्यशाळेत कृषी विभागातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना दिला सल्ला

Wardha Low Water Crops Farming: वर्धा जिल्ह्यात पावसाची तूट आणि सिंचनासाठी कमी पाणीसाठा लक्षात घेता, रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 31, 2026 | 10:21 PM
Washim Farmer Loan Waiver:

Washim Farmer Loan Waiver:

Follow Us
Follow Us:
  • रब्बी हंगामासाठी कृषी विभागाचा प्लॅन तयार
  • कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देण्याचा सल्ला
  • कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
 

Wardha News : जिल्ह्यात पावसातील तूट, जमिनीतील कमी झालेला ओलावा, विहिरी आणि बोरवेलच्या पाणीपातळीत झालेली घट तसेच सिंचनाकरिता प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता, रब्बी हंगामातील पीक नियोजन करताना शेतकऱ्यांनी उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या पाळ्यांचा अचूक अंदाज घेऊनच पेरणी व पेरणी क्षेत्र निश्चित करावे. मुख्यतः कमी पाण्यात येणाऱ्या व जास्त नफा देणाऱ्या पिकांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन मिळावे, यासाठी कृषी विभागामार्फत पीक नियोजन, सिंचन व्यवस्थापन, सुधारित पीक पद्धती आणि शासकीय योजनांच्या लाभाबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. उपलब्ध सिंचन पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असून, पाणी उपलब्ध होणाऱ्या गावातील शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत सिंचन नियोजनाची माहिती पोहोचविण्यावर भर देण्यात आलेला आहे.

कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी

जिल्ह्यातील काळ्या व मध्यम जमिनीसाठी हरभरा, करडई, मोहरी, जवस, मसूर आणि रब्बी ज्वारी ही पिके जमिनीचा प्रकार, उपलब्ध ओलावा व सिंचनाची सोय लक्षात घेऊन निवडावीत, करडई हे खोल मुळामुळे तुलनेने दुष्काळ सहिष्णू पीक असून, हरभरा पिकात जमिनीतील उर्वरित ओलाव्याचा प्रभावी वापर करता येतो. मोहरी, जवस व मसूर ही पिकेही कमी पाण्याच्या परिस्थितीत योग्य ठरू शकतात.

सूर्यफूल पिकासाठी तुलनेने अधिक सिंचनाची आवश्यकता असल्याने त्याची निवड पाण्याच्या उपलब्धतेनुसार करावी. पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडू नये यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. आवश्यकतेनुसार कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार पिकांच्या अवस्थेला अनुरूप उपाययोजना कराव्यात. पोटॅशियम नायट्रेट किंवा अॅटी-ट्रान्सपिरंटसारख्या निविष्ठांचा वापर संबंधित पिकासाठी शिफारस, योग्य मात्रा व कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा.

Wardha News : वर्धेकरांनो, पाणी जपून वापरा! १४ गावांचा पाणीपुरवठा ५ दिवस बंद, २१ ऑक्टोबरपासून तांत्रिक कामासाठी शटडाऊन

सिंचनाच्या उपलब्धतेनुसार पीक नियोजन करावे

निम्न वर्षा, बौर व पौथरा सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्धतेनुसार पाणीपाळ्यांचे नियोजन करण्यात येत आहे. पाटबंधारे विभाग व प्रकल्प सल्लागार समितीच्या निर्णयानुसार सिंचनाचे वेळापत्रक निश्चित होणार असून, साधारणपणे पेरणी व पिकांच्या प्राथमिक वाढीसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिस-या आठवड्यात पहिली पाणीपाळी आणि पिकांच्या गरजेनुसार डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दुसरी पाणीपाळी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन प्रस्तावित आहे.

बियाणे मिनीकिट, पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा

रब्बी हंगामात ज्वारी व मसूर पिकाव्या मिनीकिट योजनेंतर्गत उपलब्धतेनुसार ज्वारीची १,००० आणि मसूरची ७०० मिनीकिटे वितरित करण्याचे नियोजन आहे, प्रति शेतकरी एक मिनीकिट या प्रमाणात ज्वारीचे ४ किलो व मसूरचे ८ किलो बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या व निवड झालेल्या शेतक-यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Web Title: Wardha news farmers advised to cultivate low water crops for rabi season vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 10:21 PM

Topics:  

  • drought news
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल! आर्वी न्यायालयातील घटनेने खळबळ, आरोपीवर गुन्हा दाखल
1

Wardha News : न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल! आर्वी न्यायालयातील घटनेने खळबळ, आरोपीवर गुन्हा दाखल

Wardha News: कराळे गुरुजींचा पुढील ‘मुव्ह’ काय? २४,२४९ मतांनी दाखवली राजकीय ताकद
2

Wardha News: कराळे गुरुजींचा पुढील ‘मुव्ह’ काय? २४,२४९ मतांनी दाखवली राजकीय ताकद

सावधान! दोनदा चूक केली तर दंड, तिसऱ्यांदा थेट…; Pune शहरात पाणी वापराबाबत कठोर नियम
3

सावधान! दोनदा चूक केली तर दंड, तिसऱ्यांदा थेट…; Pune शहरात पाणी वापराबाबत कठोर नियम

Wardha News : वर्ध्यात महिला डॉक्टरला आरोपीकडून मारहाण, सीसीटीव्हीत कैद झाली घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
4

Wardha News : वर्ध्यात महिला डॉक्टरला आरोपीकडून मारहाण, सीसीटीव्हीत कैद झाली घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.