Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल! आर्वी न्यायालयातील घटनेने खळबळ, आरोपीवर गुन्हा दाखल

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील आर्वी न्यायालयात गुरुवारी धक्कादायक प्रकार घडला. न्यायालयात हजर केलेल्या आरोपीने अचानक न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकली.

  • By विवेक
Updated On: Oct 31, 2026 | 02:27 PM
Wardha Court

Wardha Court

Follow Us
Follow Us:
  • आर्वी न्यायालयात धक्कादायक प्रकार
  • न्यायाधीशांवर भिरकावली चप्पल
  • आरोपी कदीर अली रज्जाक अलीवर गुन्हा दाखल
 

Wardha News : न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपीने अचानक न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकल्याची धक्कादायक घटना आर्वी येथे घडली. गुरुवारी दुपारी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान आर्वी येथील न्यायालय क्रमांक २ मध्ये ही घटना घडताच मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी आर्वी न्यायालयाचे सह अधीक्षक शैलेश अंबुलकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी कदीर अली रज्जाक अली (४४, रा. काकडधरा) याच्याविरुद्ध आर्वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गुरुवारी दुपारी आर्वीच्या न्यायालय क्र. २ मध्ये न्यायाधीश एन. जे. देशमुख यांच्यासमोर तळेगाव पोलिसांनी आरोपी कदीर अली याला हजर केले होते. त्यावेळी तळेगाव श्यामजीपंत ठाण्याच्या पीएसआय धनश्री सगणे, पोलिस कर्मचारी श्रीकांत नायकवाडे, अतुल अडसड हेदेखील उपस्थित होते. न्यायाधीशांनी नाव विचारले असता आरोपीने आपले नाव सांगितले. त्यानंतर एक-दोन प्रश्नही विचारण्यात आले. त्यानंतर आरोपीने खिशातून एक कागद काढून खाली टाकला. तो कागद उचलण्यासाठी खाली वाकला आणि अचानक आपल्या पायातील चप्पल काढून न्यायाधीशांच्या दिशेने भिरकावली.

पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

चप्पल तेथे उपस्थित असलेले सरकारी वकील के. व्ही. वेरूळकर यांना लागली. पोलिस आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने दुसरी चप्पलही त्याच दिशेने डायसकडे फेकली, जी पंख्याला लागून न्यायालयीन कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर जाऊन पडली. ही घटना घडताच न्यायालयाच्या कक्षात एकच खळबळ उडाली. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

यापूर्वी महिला डॉक्टरला मारहाण

उल्लेखनीय असे की, आरोपी कदीर अली रज्जाक अली याने यापूर्वी महिला डॉक्टरला थापड मारल्याची घटना समोर आली होती. २१ ऑक्टोबर रोजी पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी तळेगाव-श्यामजीपंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. तेथे त्याने महिला डॉक्टरला थापड मारली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या घटनेची चर्चा थांबते न थांबते तोच आर्वी न्यायालयात चप्पल फेकल्याची घटना समोर आल्याने पोलिसांच्या उपस्थितीत दोन वेळा अशा प्रकारचे वर्तन आरोपीकडून झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Wardha News : रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप; वर्ध्यातील प्रकरणात नागपूर खंडपीठाचे निर्देश

💡

Frequently Asked Questions

  • Que: आर्वी न्यायालयात चप्पल फेकण्याची घटना कधी घडली?

    Ans: गुरुवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास आर्वी येथील न्यायालय क्रमांक २ मध्ये ही घटना घडली.

  • Que: न्यायालयात चप्पल फेकणाऱ्या आरोपीचे नाव काय आहे?

    Ans: कदीर अली रज्जाक अली (वय ४४, रा. काकडधरा) असे आरोपीचे नाव आहे.

  • Que: आरोपीविरुद्ध पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: न्यायालयाचे सह अधीक्षक शैलेश अंबुलकर यांच्या तक्रारीवरून आर्वी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Wardha news arvi court accused throws slipper towards judge vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • Wardha Crime
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News: कराळे गुरुजींचा पुढील ‘मुव्ह’ काय? २४,२४९ मतांनी दाखवली राजकीय ताकद
1

Wardha News: कराळे गुरुजींचा पुढील ‘मुव्ह’ काय? २४,२४९ मतांनी दाखवली राजकीय ताकद

Wardha News : वर्ध्यात महिला डॉक्टरला आरोपीकडून मारहाण, सीसीटीव्हीत कैद झाली घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
2

Wardha News : वर्ध्यात महिला डॉक्टरला आरोपीकडून मारहाण, सीसीटीव्हीत कैद झाली घटना, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.