Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता Google Pay, Phone Pay च्या माध्यमातून काढता येणार एसटीचे तिकीट

राज्यातील हजारो लोक प्रवास करताना एसटीने जाण्याला प्राधान्य देतात. एसटीने प्रवास (ST Ticket) करताना तिकीट काढताना ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. परिणामी, त्यांना रोख रक्कम द्यावी लागत असे. त्यात चिल्लर अभावी छोटे-मोठे वाद झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. पण आता हा त्रास दूर होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 18, 2023 | 11:59 AM
आता Google Pay, Phone Pay च्या माध्यमातून काढता येणार एसटीचे तिकीट
Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : राज्यातील हजारो लोक प्रवास करताना एसटीने जाण्याला प्राधान्य देतात. एसटीने प्रवास (ST Ticket) करताना तिकीट काढताना ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध नव्हती. परिणामी, त्यांना रोख रक्कम द्यावी लागत असे. त्यात चिल्लर अभावी छोटे-मोठे वाद झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. पण आता हा त्रास दूर होणार आहे. कारण आता Google Pay, Phone Pay च्या माध्यमातून एसटीचे तिकीट काढता येणार आहे.

एसटीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या मुख्यालयाला तिकीट मशिन्सबाबत वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आता नवीन कंपनीच्या माध्यमातून एसटीच्या कंडक्टरांना नवीन अँड्रॉइड तिकीट मशिन देण्यात येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकात एकूण 200 मशिन पाठवण्यात आली आहेत. यातील दोन दिवसांत चार मशिन संबंधित कंडक्टरांना देण्यात आली आहेत. या नवीन मशिनच्या माध्यमातून आता एसटी कर्मचाऱ्यांना बॅटरीचाही त्रास कमी होणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत या मशिनवर ऑनलाईन पेमेंटची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांना अनेकदा चिल्लरचा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, एसटी कर्मचाऱ्याकडे चिल्लर जास्त आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती लक्षात घेता आता लवकरच Google Pay, Phone Pay च्या माध्यमातून एसटीचे तिकीट काढता येणार आहे.

Web Title: Now st tickets can be purchased through google pay and phone pay soon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2023 | 11:59 AM

Topics:  

  • google pay
  • maharashtra
  • maharashtra state
  • phone pay

संबंधित बातम्या

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप
1

भाईंदरमध्ये गणपती विसर्जनाला गालबोट : ३४ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

चक्क मेलेला माणूसच झाला जिवंत! अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या तरुणाला आला अचानक खोकला…
2

चक्क मेलेला माणूसच झाला जिवंत! अंत्यसंस्कार करण्यापूर्वी, ‘ब्रेन डेड’ घोषित केलेल्या तरुणाला आला अचानक खोकला…

Mumbai Rain Update: गणपती विसर्जनावर पावसाचे सावट! मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम, IMD कडून महत्त्वाचा इशारा
3

Mumbai Rain Update: गणपती विसर्जनावर पावसाचे सावट! मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम, IMD कडून महत्त्वाचा इशारा

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
4

Mumbai News : “नाद करा पण आमचा कुठं”; तब्बल 13 वर्षांनी मुंबईतील मंडळाच्या दहीहंडीची गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.