आता झाड तोडल्यास भरावे लागतील 50 हजार रुपये, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात 13 महत्त्वाच्या निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (7 ऑगस्ट) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 13 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्यात विनापरवाना झाडे तोडल्यास 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लहान शहरांमध्ये पायाभूत सुविधांना चालना देण्यावरही चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा: बेकायदा बांधकामांच्या तोडू कारवाईसाठी एमएसआरडीसी KDMC ला देणार पत्र
दरम्यान या बैठकीत 12 विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून जलसंपदा विभाग, शेतकरी, आदिवासी आणि वन विभागासाठी महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार आतापासून झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यापूर्वी 1000 रुपये दंड आकारला जात होता. त्यामुळे आता झाडांची कत्तल किंवा झाडे तोडल्यास 50 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. विना परवानगी जंगल तोडणाऱ्यांसाठी वन विभागाच हे मोठ पाऊल उचललं आहे.
हे सुद्धा वाचा: राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी होणार मतदान आणि मतमोजणी
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये वनविभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून झाड तोडल्यास 50 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. या दंडात्मक तरतूद करण्याचा शासन निर्णय लवकरच पारित केला जाईल. तसेच पुढील आठवड्यात १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन असल्याने प्रत्येक घरात तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. 9 ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवविणार येणार असून अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकविण्यात येईल.