गणेशोत्सव काळात पुण्यातील 'या' भागांत जड वाहनांना बंदी; वाहतूक विभागाकडून आदेश जारी (संग्रहित फोटो)
पुणे : शहरात गणेशोत्सव काळात नागरिकांची साहित्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सुरक्षेची उपाययोजना व रस्त्यांवरून धावणाऱ्या जड/अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका होऊ नये तसेच शहरातील अनेक ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे राहावी, यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त हिंमत जाधव यांनी महत्त्वपूर्ण आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, आता अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अनेक जड वाहनांना शहराच्या मध्यवर्ती भागात बंदी घालण्यात आली.
२५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत अनेक रस्त्यांवर जड/अवजड वाहनांच्या वाहतुकीस २४ तास बंदी करण्यात आली आहे. त्यामध्ये शास्त्री रोड-सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोड-जेधे चौक ते अलका चौक, कुमठेकर रोड-शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोड-संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोड-फुटका बुरुज ते अलका चौक, बाजीराव रोड-पुरम चौक ते गाडगीळ पुतळा, शिवाजी रोड-गाडगीळ पुतळा ते जेधे चौक या ठिकाणी वाहतूक बंद राहील.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
तसेच कर्वे रोड-नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड-खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक, जंगली महाराज रोड-स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक, सिंहगड रोड-राजाराम ब्रिज ते सावरकर चौक, गणेश रोड / मुदलियार रोड-पॉवरहाऊस-दारुवाला-जिजामाता चौक-फुटका बुरुज चौक याप्रमाणे करण्यात आलेल्या वाहतूक बदलांचा अवलंब करून गणेशोत्सव शांततेने पार पाळण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास पुणे शहर वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही हिंमत जाधव यांनी केले आहे.
हेदेखील वाचा : गणेशोत्सव होणार गोड! इन्स्टामार्ट घरोघरी 10 मिनिटांत पोहोचवणार प्रतिष्ठित दगडूशेठ मंदिराचे मोदक