बेकायदा बांधकामांच्या तोडू कारवाईसाठी एमएसआरडीसी KDMC ला देणार पत्र
पलावा जंक्शन उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्याठिकाणी केवळ चार मजूर काम करीत आहेत. अशा प्रकारे काम केल्यास काम कसे काय मार्गी लागणार ? असा संतप्त सवाल मनसेचे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे. यानंतर आता पलावा जंक्शन पूलाच्या कामा दरम्यान आड येणाऱ्या बेकायदा बांधकामांचा प्रश्न आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसी अधिकाऱ्याना विचारले असता, या संदर्भातील कारवाई केडीएमसीने केली पाहिजे. आत्ता पर्यंत कारवाई झाली नाही. आम्ही लवकर या संदर्भातील पत्र केडीएमसीला पाठविणार असल्याची माहिती एमएसआरडीसीकडून आमदारांना देण्यात आली आहे. आत्ता ही कारवाई कधी होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे सुद्धा वाचा: भ्रष्ट इस्टेट एजंट आणि सदनिका भाडेकरूवर कारवाई व्हावी, मनसेची मागणी
मनसे आमदार राजू पाटील यांनी एमएसआरडीसीचे सह संचालक मनोज जिंदाल यांच्यासह सुरु असलेल्या पलावा पुलाच्या काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या व्यक्तिसोबत मंगळवारी पाहणी केली. या पाहणी दरम्यान पूलाचे काम का रखडले आहे. या बाबतची चर्चा केली. पलाावा जंक्शनला पूलाचे काम सुरु आहे. पूलाच्या खाली काही प्रमाणात दुकाने, हॉटेल, वाईन शॉप असल्याने कामाला अडथळा येत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी यापूर्वीच केला आहे. बेकायदा बांधकामाबाबत केडीएससी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा: कोट्यवधीच्या पुलाच्या कामासाठी फक्त चार कामगार, कामात दिरंगाई केल्यास दंड; मनसेचा msrdc च्या अधिकाऱ्यांचा ठेकेदाराला इशारा
एमएसआरडीसीचे सहसंचालक जिंदाल यांना आमदार पाटील यांनी सर्व बेकायदा बांधकामे दाखविली. आत्ता या बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला. सहसंचालक जिंदाल यांनी सांगितले की, ही कारवाई केडीएमसीच्या अंतर्गत येते. केडीएमसीने अद्याप कारवाई केली नाही. आम्ही या संदर्भात केडीएमसीला पत्र पाठविणार आहोत. प्रश्न असा आहे की, सर्व सामान्यांच्या घरावर हातोडा आणि बुलडोझर चालविणारी केडीएमसी पलावा जंक्सन येथील बेकायदा बांधकामांच्या विरोधात मौन का बाळगून आहे. कारवाई कधी केली जाईल. एमएसआरडीसीला पत्र लिहण्याची वेळ का आली या प्रश्नाचे उत्तर महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.