पालघर जिल्ह्यातील उर्से गावाने तब्बल 53 वर्षे अखंड परंपरा जपली आहे. या गावात प्रत्येक घरात वेगवेगळे गणपती बसवले जात नाहीत, तर संपूर्ण गाव एकत्र येऊन एकच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करतो. यंदाच्या गणेशोत्सवात गावातील तरुणांनी आकर्षक सजावट करत ‘ऑपरेशन सिंदूर’ची प्रतिकृती साकारली आहे. पूजेचा मान दरवर्षी चिठ्ठ्या टाकून ठरवला जातो. गौरी-गणपतीला एकाच दिवशी निरोप देण्याची ही आगळीवेगळी परंपरा आहे. जिल्हास्तरीय गणराया पुरस्कार मिळाल्यामुळे गावाचा मान आणखी उंचावला आहे.