सर्वच महिलांना लांबलचक सुंदर आणि चमकदार केस हवे असतात. केसांच्या वाढीसाठी सतत काहींना काही उपाय केले जातात. कधी हेअर केअर प्रॉडक्ट वापरले जातात तर कधी वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून केसांची काळजी घेतली जाते. पण केसांना वरून पोषण देण्याऐवजी आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या लांबलचक वाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांच्या सेवनामुळे महिनाभरात केस अतिशय लांबलचक आणि सुंदर होतील. (फोटो सौजन्य – istock)
केसांच्या लांबलचक वाढीसाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड, बायोटिन आणि विटामिन बी६ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे केसांची मूळ मजबूत होतात आणि केस सुंदर दिसतात. केसांच्या घनदाट वाढीसाठी नियमित एक किंवा दोन अक्रोड खावे.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी उठल्यानतंर दोन किंवा तीन बदाम खाल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
काजूमध्ये झिंक, लोह आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे गोड पदार्थ बनवताना काजूचा वापर केला जातो. तसेच सकाळच्या नाश्त्यात काजू स्मूदी बनवून पिऊ शकता.
पिस्त्यामध्ये बायोटिन आणि प्रथिने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे केस गळणे किंवा केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होते. पिस्त्याच्या सेवनामुळे केस लांबलचक आणि मजबूत होतात.
नियमित चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्यात तुम्ही लिंबू मिक्स करून सुद्धा पिऊ शकता. केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि टाळू हायड्रेट ठेवण्यासाठी चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन करावे.