फोटो सौजन्य सोशल मिडिया
Maharashtra Shasan : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भटके विमुक्त बांधवांच्या न्याय हक्का साठी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत दिनांक २७ ते २९ सप्टेंबर रोजी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत भटके-विमुक्त बांधवांना त्यांचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास दाखला यांसह विविध शासकीय प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी शिबिरांमध्ये उपस्थित राहणार आहेत. भटके-विमुक्त बांधवांनी या विशेष अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मिडियाच्या ट्विटर अकांऊट द्वारे या संकल्पाची माहीती देण्यात आली आहे.
मागास आणि बहुजन कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळ व तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना आणि मूलभूत हक्कांशी संबंधित कागदपत्रांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा अभियानाचा उद्देश आहे.
शिबीरापूर्वी वस्तीस्तरावर लाभार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. अभियानादरम्यान पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप करण्यावर भर दिला जाणार आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा व तालुकास्तरावरील विविध विभागांचे सक्षम अधिकारी शिबिरांना उपस्थित राहणार आहेत.
भटके-विमुक्त बांधवांच्या हक्कांसाठी विशेष अभियान! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत 27, 28 आणि 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे. या विशेष अभियानांतर्गत… pic.twitter.com/tPOEHupGx7 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 20, 2026
अभियानाचे उद्घाटन संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार असून स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. जिल्हाधिकारी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समन्वय साधतील. शिबिरांचे ठिकाण आणि वेळ याबाबतची माहिती संबंधित जिल्हा व तालुका प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
महाराषट्रातील भटक्या विमुक्ता पर्यंत ही योजना पोहचता यावी आणि महाराष्ट्रराज्यात त्याच्या जमातीची संख्या लक्षणीय आहे तर त्याच्या जिवन शैलीमुळे भटक्या विमुक्ताच्या योजना त्याच्या पर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याचे या शासन निर्णयात दिले आहे.
भटक्या -विमुक्तांना न्याय आणि हक्क मिळून देऊन त्यांना शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देणे हा उद्देश शासनाचा आहे. यात भटक्या विमुक्तांसाठी आधाक कार्ड , मतदान ओळखपत्र , जात प्रमाण पत्र , उत्पनाचा दाखला नाॅन क्रीमीलेयर , रहिवासी दाखला अशी कागद पत्रे उपलब्द करुन देणे होय .
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भटके विमुक्त बांधवांच्या न्याय हक्का साठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दिनांक २७ ते २९ सप्टेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमाला संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहे. भटके विमुक्तांसाठी मिळणाऱ्या योजनांचा लाभ कसा घेता येईल ते या शिबिरा मार्फत कळणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त भटके-विमुक्त बांधवांनी या विशेष अभियानाचा लाभ घ्यावा






