फोटो सौजन्य AI
पामफिलोवा यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वेब सर्व्हर, ऑनलाइन मतदान सेवा आणि दूरसंचार नेटवर्कवर मोठ्या प्रमाणात DDoS हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांचा उद्देश निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर परिणाम करणे आणि ऑनलाइन सेवांचा वेग कमी करणे हा असल्याचे रशियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, हल्ल्यांमुळे निवडणूक प्रक्रिया ठप्प झाली नसल्याचा दावा रशियन प्रशासनाने केला आहे.
Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!
हे हल्ले अत्यंत व्यावसायिक आणि सुसूत्रपणे काम करणाऱ्या गटांकडून करण्यात आल्याचा दावा पामफिलोवा यांनी केला. त्यांच्या मते, या गटांनी हल्ल्यांसाठी AI तंत्रज्ञान आणि आधुनिक डिजिटल साधनांचा वापर केला असावा. रशियन अधिकाऱ्यांनी काही हल्ले परदेशातून झाल्याचेही सांगितले आहे. मात्र, या हल्ल्यांमागे नेमका कोणता गट किंवा देश आहे, याबाबत स्वतंत्र पुष्टी उपलब्ध झालेली नाही.
Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!
निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी मॉस्कोच्या दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीवर रात्रीभर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला झाल्याचेही रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले होते. हल्ल्यांमुळे काही वापरकर्त्यांना ऑनलाइन मतदानाच्या पायाभूत सुविधांपर्यंत पोहोचताना विलंब जाणवल्याचे वृत्त आहे.
मात्र, रशियन निवडणूक आयोगाने प्रणाली कार्यरत असल्याचे सांगितले. त्यामुळे रशियाच्या निवडणुकीत पारंपरिक राजकीय संघर्षासोबतच सायबर युद्धाचे नवे आव्हान ही ठळकपणे समोर आले आहे.






