Number of seats available for civil flights at Pune airport increased pune news
दीपक मुनोत : पुणे : पुणे विमानतळावरील नागरी उड्डाणासाठी उपलब्ध असलेल्या स्लॉटची संख्या आता विक्रमी २३५ वर पोहोचली आहे, पुणे विमानतळावरील ही संख्या या विमानतळाच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. उन्हाळी वेळापत्रकात उपलब्ध असलेल्या 220 स्लॉटमध्ये 15 नव्या स्लॉटची भर पडली असून, त्यामुळे पुण्याच्या हवाई सेवेला नवसंजीवनी मिळाली आहे.
पुणे विमानतळ हे भारतीय हवाई दलाच्या नियंत्रणाखाली असल्याने, नागरी उड्डाणासाठी स्लॉट मिळवणे नेहमीच आव्हानात्मक ठरत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून, नागरी उड्डाणांसाठी आणखी स्लॉट उपलब्ध झाले आहेत.ही वाढ पुणेकर प्रवाशांसाठी मोठी सुविधा ठरणार असून, देशातील इतर महानगरांशी पुण्याचा हवाई दुवा अधिक बळकट होणार आहे. प्रवाशांसाठी वेळेची बचत आणि नव्या मार्गांची उपलब्धता यामुळे पर्यटन, व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रालाही चालना मिळण्याची शक्यता आहे.
स्लॉट म्हणजे काय?
स्लॉट म्हणजे विमानाच्या ठराविक वेळेला उड्डाण व लँडिंग करण्याची परवानगी असणे. ही संख्याच विमानतळाच्या क्षमतेचं व विमान वाहतुकीचं मोजमाप असते. त्यामुळे पुणे विमानतळावर आता विक्रमी २३५ वर पोहोचली आहे. यामुळे विमानसेवेमध्ये मोठा आणि चांगला बदल दिसून येईल.
स्लॉट वाढीचा फायदा काय?
विमान तळावर स्लॉटची संख्या वाढल्यामुळे नवीन डेस्टिनेशनसाठी उड्डाणांना वाट मोकळी होते. त्याचबरोबर यामुळे अधिक विमानांची फेरे घेण्यास शक्य होते. त्यामुळे प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होतो. तसेच प्रवाशांच्या गर्दीचा भार होणार कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याबाबत नागरी विमान वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, पुणे विमानतळावर नागरी विमानांसाठी स्लॉट वाढवणं हे गरजेचे होते. संरक्षण क्षेत्राच्या मर्यादा लक्षात घेता, हे आव्हानात्मक होते. मात्र सातत्याने पाठपुरावा करून अखेर यामध्ये यश मिळालं. नव्या १५ स्लॉटच्या माध्यमातून पुण्याच्या हवाई संपर्कात मोठी सुधारणा होणार असून, देशातील विविध गंतव्यांशी थेट विमानसेवा सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काळात पुणेकर प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे,” अशा भावना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुण्यातील सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ एका मद्यधुंद चालकाने चहा पित असणाऱ्या १२ जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. १२ विद्यार्थ्यांमध्ये काही जण एमपीएससीचा अभ्यास करणारे देखील विद्यार्थी जखमी झाले आहेत. याबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा आजचा पेपर गेल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी देण्याबाबत मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली असून या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील लक्ष ठेवून आहेत. आमदार हेमंत रासने यांनी या सर्व घटनेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करण्यात यावेत असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांवरील उपचारांचा खर्च शासनातर्फे केला जाणार असल्याचे समोर आले आहे.