मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या जुन्या कल्याण शहर मंडळातर्फे स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान
कल्याण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आवाहनानुसार जुने कल्याण मंडळातर्फे कल्याण पश्चिमेमध्ये स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. कल्याण शहर मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता पवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
येथील पारनाका परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ, स्वामी विवेकानंद पुतळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यासोबतच कल्याण पश्चिमेतील माता रमाबाई आंबेडकर उद्यान परिसरातही स्वच्छता अभियान राबविण्यासह वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एक पेड माँ के नाम हा अनोखा उपक्रमही साजरा करण्यात आला. ज्यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध झाडांच्या रोपट्यांची लागवड केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत देशाने अक्षरशः कात टाकली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आज प्रत्येक क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी करत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. देशाच्या विकासाचा वारू आज “न भूतो..” अशी प्रगती करत असून “सबका साथ सबका विकास” या घोषवाक्याखाली लाखो लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा मोठा वाटा आहे. अशा या लोकनेत्याचा वाढदिवस आज संपूर्ण देशामध्ये साजरा होत असून जुने कल्याण पश्चिम मंडळातर्फेही सामाजिक उपक्रमांद्वारे तो साजरा करण्यात आल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे.
यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, नगरसेवक संदीप गायकर, भाजपा जुने कल्याण शहर मंडल अध्यक्ष अमित धाक्रस, जुने कल्याण शहर मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता पवार, महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, मध्य कल्याण मंडल अध्यक्ष रितेश फडके, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालयाच्या बी. के. कल्पना दीदी, पवित्रा दीदी, चांदणी दीदी, जिल्हा प्रभारी पतंजली योगसमिती वंदना कल्याणकर, संज्योत पाचघरे, विवेक वाणी, प्रताप टूमकर, राजेश ठाणगे, विशाल शेलार, निलेश गायकर, गणेश गायकर, जनार्दन कारभारी, भिका भदाणे, संदीप जाधव, बिजूल लाड, ऋषिकेश क्षोत्री, समृद्धी देशपांडे, रमेश मांडवे, अजिंक्य चवळे, स्नेहल सोपारकर, अरुणा लोहार, चंदू बिरारी, रोहित लांबतुरे, प्रल्हाद महाडिक, छाया हांडे, शकुंतला अग्रवाल, प्रज्ञा बांगर, रत्ना कुलते, शीतल पाटील, दिपा शाह यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
तसेच भारत आता लवकरच जागतिक तिसरी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे. त्यांचे राष्ट्र निर्मिती आणि विकासातील योगदान आणि सेवा भावाचा सन्मान करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने 15 दिवसांचे विशेष अभियान ‘सेवा पर्व 2025’ ची सुरुवात केली आहे. हा कार्यक्रम 2 ऑक्टोबरपर्यंत चालेल. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सेवा भावना आणि त्यांचे समर्पण यांचा सन्मान करण्यात येईल.