shivsena uddhav thackeray press conference live in mumbai on hindi language compulsory in school
भारतीय जनता पक्ष (बीजेपी) आणि विरोधकांना मुंबई तोडायची आहे. मुंबई आणि महाराष्ट्र गिळण्याचा या गुजरातींचा डाव आहे. असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबई येथील बांद्रा-कुर्ला कॉम्पेल्स येथे झालेल्या मविआच्या शेवटच्या संयुक्त सभेत विरोधकांचा खरपूस समाचार घेताना बोलत होते.
यावेळी त्यांनी संपुर्ण मुंबई बिल्डरच्या घशात घातली जात आहे. याशिवाय धारावीच नाही तर आख्खी मुंबई अदानींच्या घशात घातली जात आहे. अदानीची सुल्तानी हे नवे संकट तयार झाले आहे. अगदी कोल्हापुरच्या राधानगरीचे पाणी, चंद्रपूरमधील शाळा, एअरपोर्ट अगदी टोलनाके सुद्दा अदानीला दिले जात आहे. हे सरकार हे सगळे आदेश काढत आहे. वीज सुद्धा अदानीकडून विकत घ्यावी लागत आहे. असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.
हे देखील वाचा – “…यासाठी महायुती सरकारला साथ गरजेची”; योगी आदित्यनाथांचे मतदारांना महत्वाचे आवाहन
गुजरातहून माणसे आणून नजर ठेवली जात आहे
याशिवाय परराज्यातून माणसे आणून आपल्यावर नजर ठेवली जात आहे. हे मी नाही तर त्यांच्याच नेत्या पंकजा मुंडे बोलत आहे. महाराष्ट्रातील 90 हजार बुथवर भाजपने पथके नेमली आहेत. त्यात सगळी परराज्यातील विशेषता गुजरातमधील आहेत. यापुर्वी अशी कोणत्याही निवडणुकीत माणसे आणून नजर ठेवली जात नव्हती. असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे.
याबाबत बोलताना उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे जाहीर आभार देखील मानले आहे. तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली. अशा शब्दांत त्यांनी त्यांचा कौतूक केले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मविआच्या मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धन्यवाद देत म्हटले आहे की, पंकजाला मी खास धन्यवाद देतो की तिने महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली आहे. मा. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी न्यायदेवतेवरच्या डोळयावरची पटटी काढली अन स्वत: च्या डोळ्यावर बांधली पण तिने तसे केले नाही. महाराष्ट्र आणि मुंबई बळकाविण्याचा विरोधकांचा डाव आहे. असेही ते यावेळी म्हणाले आहे.
…तर मोदींना राजीनामा द्यावा
पंतप्रधान मोदी एक है तो सेफ है ची घोषणा देतात, पण मोदी है तो भ्रष्टाचारी, गद्दार, अत्याचारी सेफ है असेच म्हणावे लागेल. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा राज्यात सगळे सेफ होते, आणि मोदी पंतप्रधान असून, देखील कोणी सेफ नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि काम कसे करावे हे शिवसेनकडून शिकून घ्यावे. उद्धव ठाकरे गुजराती लोकांना उद्देशून म्हणाले की, मी गुजरातच्या विरोधात नाही, गुजरातमधील लोक अनेक वर्षे झाली तरी कोणतेही भांडण नाही. पण मोदी आणि शहा तुमच्या आमच्यात भिंत बांधत आहेत हे लक्षात घ्या. असेही ठाकरे म्हणाले आहे.