नागपूर : हिवाळी अधिवेशनातील आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळं आज सूप वाजणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्य पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक होत सरकारच्या विरोधात आंदोलन करताहेत. या हिवाळी अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले. सीमावाद, सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान मृत्यू प्रकरण, एयू, ईएस, राहुल शेवाळे, मंत्र्यांचे घोटाळे इत्यादी अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आमनेसामने येत सूडाचे व कुरघोडीचे राजकारण केल्याचे पाहिले. विरोधक मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक असून, दररोज आंदोलन करताहेत, अनेक मुद्यांवरुन विरोधक-सत्ताधारी आक्रमक होत, आमनेसामने येताहेत. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी मंत्री राजीनामा तसेच विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव तसेच नवीन बॉम्ब फुटण्याची शक्यता आहे.
[read_also content=”पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी अनंतात विलीन; पंतप्रधान मोदींनी आईला दिला मुखाग्नी https://www.navarashtra.com/india/pm-narendra-modi-mother-hiraben-modi-dead-modi-gave-mother-mukhagni-358005.html”]
दरम्यान, आज शेवटच्या दिवशी देखील विरोधक आक्रमक होत, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत, राज्यपाल हटावाचे हातात फलक घेत आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी राज्यपालांच्या राजीनामा घ्या…राज्यपाल हटाव…अशी घोषणाबाजी करत विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. तसेच भ्रष्ट व घोटाळेबाज मंत्री यांचेही राजीनामे घ्या अशी विरोधकांनी मागणी केली. यावेळी महाविकास आघाडी सरकरामधील सर्व आमदार उपस्थित होते.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे मविआ नेत्यांनी याबाबतचं पत्र सोपावलं आहे. काँग्रेसचे आमदार सुनील केदार, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांकडे दिलं आहे. मविआने दिलेल्या पत्रावर महाविकास आघाडीच्या 39 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याने नार्वेकरांविरोधात हा अविश्वास प्रस्ताव देण्यात आला आहे. मात्र या पत्रावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची स्वाक्षरी नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.