Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अधिवेशनात बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून विरोधी पक्षांचे आमदार आज बनियान घालून आले होते. शिवाय कमरेला टॉवेल गुंडाळला होता. चड्डी बनियान गँगच्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 16, 2025 | 03:22 PM
अधिवेशनात बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं

अधिवेशनात बनियान घालून आमदारांचं आंदोलन, ‘चड्डी बनियान गँग’च्या घोषणांनी विधिमंडळ दणाणलं

Follow Us
Close
Follow Us:

विधिमंडळात सध्या एक मुद्दा गाजतोय तो म्हणजे चड्डी बनियान गँगचा. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात उपाहारगृहातील कर्मचाऱ्यांना शिळं जेवण दिल्याबद्दल मारहाण केली होती. तोकड्या कपड्यांवर असलेल्या गायकवाड यांचा हा मारहाणीचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. आदित्य ठाकरेंनी सभागृहात चड्डी बनियान गँग म्हणत शिंदे गटाचा चिवचलं होतं. त्यानंतर यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आज काही आमदार बनियान घालून आले होते. कमरेला टॉवेल गुंडाळला होता. यावेळी त्यांनी चड्डी बनियान गँगच्या घोषणाही दिल्या.

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् इकडे शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; ‘या’ पक्षाशी युती करत उबाठा-मनसेला दिला धक्का

सध्या राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून आज विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि काँग्रेसच्या आमदारांनी एकत्र येत अंगात बनियान घातली होती. कमरेला टॉवेल गुंडाळत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सतेज पाटील, महेश सावंत या आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी अंबादास दानवे म्हणाले की, चड्डी बनियान गँगने महाराष्ट्रात हैदोस घातला आहे. कँटिनमध्ये जाऊन आमदार कर्मचाऱ्याला मारहाण करतात. कुणी सिगारेट पिताना सुटकेसभर पैसे जगाला दाखवत. कुणी चड्डी-बनियानवर घरात बसून ओम फट म्हणतं. चड्डी बनियान गँगची दहशत पूर्वी महाराष्ट्रात होती. ही गँग शेतात, वस्त्यांवर दरोडे टाकायची. आताची चड्डी बनियान गँग महाराष्ट्रावर दरोडा टाकण्याचे काम करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर…; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

संजय गायकवाड गेल्या आठवड्यात आमदार निवासातील कँटिनमध्ये बनियान आणि टॉवेलवर जाऊन एका कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यांचा मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर याचे पडसाद विधिमंडळातही उमटले. कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली. तसंच याच दरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते आपल्या बेडरुममध्ये बनियानवर बसलेले दिसत होते. त्याआधी मंत्री भरत गोगावले यांच्याही घरातील टॉवेलवरचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

Web Title: Opposition mla unique protest in monsoon session wearing baniyan and towel slogan chaddi baniyan gang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 03:22 PM

Topics:  

  • Assembly Monsoon Session 2025
  • Maharashtra Politics
  • Monsoon Session

संबंधित बातम्या

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर
1

भाजपचा बिनविरोधचा डाव फसला; काँग्रेस उमेदवाराने नाकारली 10 लाखांची ऑफर

Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता
2

Maharashtra Politics : राज्यातील 32 जिल्हा परिषदांसह 336 पंचायत समितीच्या निवडणुका आज जाहीर होण्याची शक्यता

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान
3

Raigad News : “…हाच आमचा श्वास”; मतदारसंघात शाश्वत विकास करण्याबाबत सुनील तटकरेंचे मोठे विधान

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ
4

Maharashtra Politics: राजकारण फिरले! ‘या’ बड्या नेत्याने सोडली शरद पवारांची साथ, निवडणुकीआधी खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.