Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नरेंद्र मोदींपेक्षा आमच्या सुप्रिया सुळेंना जास्त मते पडली: पवारांनी डिवचलं

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास १५ दिवस उलटून गेल्यानंतर आज (२० जून) शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयावर भाष्य करत थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 20, 2024 | 03:22 PM
सौजन्य- X@PawarSpeaks

सौजन्य- X@PawarSpeaks

Follow Us
Follow Us:

बारामती : खासदार सुप्रिया सुळे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा जास्त मतांनी निवडून आल्या, असे विधान करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत  होते.

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळपास १५ दिवस उलटून गेल्यानंतर आज (२० जून) शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयावर भाष्य करत थेट पंतप्रधानांवरच निशाणा साधला आहे. देशाच्या पंतप्रधानांपेक्षा सुप्रिया सुळे जास्त मतांनी निवडून आल्या. पंतप्रधान दीड लाख मतांनी विजयी झाले. तर सुप्रिया सुळेंना एक लाख ५४ हजार मते पडली, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नुकत्याच झालेल्य लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढाई ही सर्वात प्रतिष्ठेची लढाई ठरली. बारमतीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी अशी लढत झाली. यांत बारामतीकरांनी सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मते टाकली.

शरद पवार म्हणाले,  1967 साली मी नुकताच कॉलेज जीवनातून बाहेर आलो होतो. सोमेश्वर कारखान्याचे बाबूलाल काकडे यांच्या विरोधात निवडणूक लढलो आणि बारामतीकरांनी मला विजयी केले. बारामतीमधील तरुण पिढीने मला नेहमीच साथ दिली. सुप्रिया सुळे यांची २०२४ ची ही निवडणूक चौथी निवडणूक असतानाही त्यांना प्रचंड मतांनी विजयी केले. बारामतीत्. जनतेला कोणते बटन दाबायचे हे सांगावे लागत नाही.

भाजप आणि मोदी सरकार यांच्याबद्दल लोकांच्या मनातील विश्वासाला तडा गेला आहे. मोदींच्या गॅरंटीवर आता लोकांना विश्वास राहिला नाही, असेच चित्र महाराष्ट्रात आणि देशात दिसत आहे. हेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट झाले. पंतप्रधान मोदींची गॅरंटी खोटी निघाली, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींवर टीकास्त्र डागले. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची महाराष्ट्रात भाजप मागे पडला. इतकेच नव्हे तर, भाजपला केंद्रातही स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. पण तरीही एनडीएचे सरकार स्थापन केले आहे. निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपवर टिका केली.

जनतेचा आता मोदींवर आणि त्यांच्या सरकारवर विश्वास उरला नाही. मोदींनी जी आश्वासने दिली होती ती गेल्या 5-10 वर्षांत कधीही पाळली नाही, आता हे लोकांच्या लक्षात आले आहे.  पण आता लोकांना बदल हवा आहे, त्यामुळे राज्यात हे चित्र बदलल्याचे शरद पवार यांनी यावेळी नमुद केले.

 

 

Web Title: Our supriya sule got more votes than narendra modi pawar said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2024 | 03:22 PM

Topics:  

  • loksabha election 2024
  • narendra modi
  • supriya sule

संबंधित बातम्या

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदींचा सिंहाचा वाटा; एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन
1

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदींचा सिंहाचा वाटा; एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

Sharad Pawar News: पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे पण; नेहरू-इंदिरा गांधींच्या योगदानावरून शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
2

Sharad Pawar News: पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे पण; नेहरू-इंदिरा गांधींच्या योगदानावरून शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला

G-7 Summit साठी पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेणार भेट, ट्रम्प भेटीचीही शक्यता
3

G-7 Summit साठी पंतप्रधान मोदींचा युरोप दौरा; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांची घेणार भेट, ट्रम्प भेटीचीही शक्यता

गरिबांच्या विरोधातील आर्थिक धोरणे, तडजोड केलेले परराष्ट्र धोरण; बारा वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावरून राहुल गांधींचा निशाणा
4

गरिबांच्या विरोधातील आर्थिक धोरणे, तडजोड केलेले परराष्ट्र धोरण; बारा वर्षांतील मोदी सरकारच्या कारभारावरून राहुल गांधींचा निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.