Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

DY Patil Passed Away : मोठे शिक्षणसम्राट हरपले! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

Padmashri d y patil passes away: पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कोल्हापुरात निधन झाले. ते शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, माजी राज्यपाल आणि नवी मुंबई व पुणे येथे डी. वाय. पाटील विद्यापीठांची स्थापना करणारे दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जात होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 12:00 PM
मोठे शिक्षणसम्राट हरपले! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

मोठे शिक्षणसम्राट हरपले! पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

Follow Us
Follow Us:
  • पद्यश्री डी वाय पाटील यांचं कोल्हापूरमध्ये निधन
  • मोठे शिक्षणसम्राट, माजी राज्यपाल
  • नवी मुंबई, पुण्यात डी वाय पाटील विद्यापीठाची स्थापना
DY Patil Passed Away: पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (DY Patil Passed Away) यांचे मंगळवारी सकाळी कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशातील शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचा नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी शिक्षणाचा प्रसार, आधुनिक शैक्षणिक संस्था उभारणी आणि विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्यभर कार्य केले.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण आणि सार्वजनिक जीवनात मोठी मजल मारली. समाजसेवा, शिक्षणाचा प्रसार आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था आज देश-विदेशात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जातात.

DY पाटील मैदानावर होणार कोल्ड प्ले संगीत कार्यक्रम ; सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

राजकीय कारकिर्दीतही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. काही काळ ते काँग्रेसपासून दूर राहिले असले, तरी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख कायम होती. शांत, संयमी आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सुसंवाद राखणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना मान मिळत होता. डॉ. पाटील यांनी त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम केले. राज्यपाल म्हणून त्यांनी घटनात्मक मूल्यांचे पालन करत प्रशासनात समन्वय राखण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यकाळाची विविध स्तरांवर प्रशंसा झाली होती.

शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची सर्वाधिक ओळख म्हणजे नवी मुंबई आणि पुणे येथे उभारलेली डी. वाय. पाटील विद्यापीठे. वैद्यकीय, दंतवैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कृषी आणि इतर उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात या संस्थांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली असून, अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा त्यांनी दिलेला वारसा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे.

डी वाय पाटील व्यवस्थापकांविरोधात काँग्रेसचा निषेध, पाहा व्हिडिओ

Web Title: Padmashri dr d y patil passes away in kolhapur former governor educationist dy patil university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 11:50 AM

Topics:  

  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Padmashri Dr. D.Y. Patil: शिक्षणाचा यज्ञ पेटवणारे शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांचे शैक्षणिक कार्य…
1

Padmashri Dr. D.Y. Patil: शिक्षणाचा यज्ञ पेटवणारे शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड; जाणून घ्या त्यांचे शैक्षणिक कार्य…

Navi Mumbai: नवी मुंबईत अद्ययावत ग्रंथालय सज्ज; डॉ. आंबेडकरांचे नाव देणार – आ. मंदाताई म्हात्रे
2

Navi Mumbai: नवी मुंबईत अद्ययावत ग्रंथालय सज्ज; डॉ. आंबेडकरांचे नाव देणार – आ. मंदाताई म्हात्रे

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
3

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.