Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

क्लस्टर योजनेवरून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान महायुतीतील हा वाद आता राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 02, 2026 | 03:50 PM
महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

महायुतीत वाढणार संघर्ष? क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा

Follow Us
Follow Us:
  • क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांची शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
  • यूडीसीपीआर आणि एफएसआय वाढीवर नवी मुंबईबाबत चिंता व्यक्त
  • महायुतीतील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा रंगली
 

महायुतीतील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील समन्वयाच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी क्लस्टर योजनेवरून उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर सार्वजनिकपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत नव्या वादाची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात या नव्या खासदारांपैकी काहींना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी राज्यात शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

यूडीसीपीआर संदर्भात प्रश्न उपस्थित

या घडामोडी सुरू असतानाच विधानसभेत बोलताना गणेश नाईक यांनी क्लस्टर विकास योजनेवर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की, ज्या इमारती अतिधोकादायक नाहीत किंवा ज्यांना ३० वर्षे पूर्ण झालेली नाहीत, त्या इमारतींनाही क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा पद्धतीने योजना राबवणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘…नाहीतर चिन्ह गोठेल’; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

नाईक यांनी यूडीसीपीआर (Unified Development Control and Promotion Regulations) संदर्भातही प्रश्न उपस्थित केला. नवी मुंबईतील सर्व इमारतींना नव्या नियमांनुसार अतिरिक्त एफएसआय दिल्यास शहराच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण येईल आणि शहराच्या नियोजनावर गंभीर परिणाम होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

“गणेश नाईकच्या नादाला लागला तर…”

यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत इशाराही दिला. “गणेश नाईकच्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा नीट ठेवू देणार नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी हा रोख थेट एकनाथ शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Aditya Thackeray : विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; आदित्य ठाकरे यांचे पोलीस महासंचालकांना पत्र

या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा समोर आले असून, क्लस्टर योजनेवरून सरकारमध्येच वेगवेगळी मते असल्याचे चित्र दिसत आहे. आता या टीकेला एकनाथ शिंदे किंवा शिवसेना शिंदे गटाकडून काय उत्तर दिले जाते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या मुद्द्यावर सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच या वादाचे पुढील चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

Web Title: Ganesh naik on eknath shinde cluster scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Ganesh Naik
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
1

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
2

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
3

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.