Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, UAE च्या दौऱ्यावर असताना श्रीकांत शिंदेंची घणाघाती टीका

पहलगाम हल्ल्यावरून खासदार श्रीकांत शिंदेनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. ही टीका त्यांनी UAE च्या दौऱ्यावर असताना केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 23, 2025 | 09:34 PM
पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, UAE च्या दौऱ्यावर असताना श्रीकांत शिंदेंची घणाघाती टीका

पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान, UAE च्या दौऱ्यावर असताना श्रीकांत शिंदेंची घणाघाती टीका

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तान दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असून पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला, अशी घणाघाती टीका संयुक्त अरब अमिरात दौऱ्यावर गेलेले शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने आज दुसऱ्या दिवशी यूएईमधील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली.

आपल्या प्रतिनिधींशी चर्चा करताना शिंदे म्हणाले की, आता संपूर्ण देशासाठी पाकिस्तानचं खरं रूप जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो आहे. जैश-ए-मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांची कार्यपद्धती एकसारखीच आहे. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशवातवादी संघटनेने घेतली होती. मात्र पाकिस्तानच्या दबावानंतर त्यांनी ट्विट नष्ट केले. दहशतवादाने भारतालाच नाही तर यूएई, युके, अमेरिका अशा देशांना फटका बसला. जगाच्या पाठिवर असा एकही देश नाही ज्याने दहशतवादाचे परिणाम भोगलेले नाही.

पावसाळ्यापूर्वी म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींच्या दुरुस्तीला गती; मंत्री लोढांच्या पाठपुराव्याला यश

ते पुढे म्हणाले की, आम्ही संपूर्ण जगाला सांगत आहोत की दहशतवादाविरुद्ध एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. यूएई, जपान यांनी भारताच्या या उपक्रमाचे कौतुक केलं आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांतून आलो आहोत, काही विरोधक आहेत, काही सत्ताधारी पक्षातले आहेत. पण तरीही आम्ही एकत्र आहोत. आम्ही हा संदेश देत आहोत की अशा परिस्थितीत आम्ही दहशतवादाविरुद्ध एकसंघ आहोत, असे शिंदे म्हणाले.

अबुधाबीमध्ये बीएपीएस मंदिराला आज भारतीय खासदारांनी भेट दिली. यावेळी खासदार शिंदे म्हणाले की बीएपीएस संस्थेच्या प्रयत्नांनी अबुधाबीमध्ये उभारलेलं भवदिव्य मंदिर हे भारतीयांच्या आस्थेचा आणि अस्मितेच प्रतिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमधून इथं बीएपीएस मंदिरासाठी योगदान दिले. या मंदिरासाठी जमीन मुस्लिम समुदायाने दिली तर मंदिराचे आर्किटेक्ट ख्रिश्चन व्यक्तीने तयार केले. एकूणच अबुधाबीतील वाळवंटातले बीएपीएस मंदिर हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक आहे.

माणुसकीचे उत्तम उदाहरण! प्राध्यापकाच्या भूतदयेमुळे जखमी घुबडाला नवे जीवन

श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील खासदारांचे शिष्टमंडळ ‘यूएई’नंतर काँगो, लायबेरिया आणि सीएरा लिओन या देशांना भेट देणार आहे. शिष्टमंडळाकडून सीमापार दहशतवादाच्या आव्हानाचा सामना आणि पाकिस्तानच्या पुरस्कृत दहशतवादी धोरणांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलखोल केली जाणार आहे.

Web Title: Pakistan is a shelter for terrorists shrikant shindes scathing criticism while on a visit to uae

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • maharashtra news
  • pakistan
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
3

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
4

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.