Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar Crime News: डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट

डहाणू शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेबाहेरच 'नकली नोटा तपासून देतो' असा बहाणा करून २ अज्ञात इसमांनी हातचलाखी करत महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक केली.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 11, 2026 | 06:54 PM
Palghar Crime News: डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट (फोटो सौजन्य: social media)

Palghar Crime News: डहाणू शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ; हातचलाखीने महिलेची १५ हजारांची केली लूट (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

Palghar Crime News: डहाणू शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेबाहेरच ‘नकली नोटा तपासून देतो’ असा बहाणा करून २ अज्ञात इसमांनी हातचलाखी करत महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे डहाणूत गुन्हेगारांना कायद्याचे भय उरले आहे का?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

डहाणू शहरातील सेंट्रल बँक शाखेबाहेर नकली नोटा तपासून देण्याचा बहाणा करत दोन अज्ञात इसमांनी हातचलाखी करून महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना शनिवारी घडली. बँकेतून काढलेल्या पैश्यातील खोट्या नोटा तपासून देण्याच्या नावाखाली आरोपींनी महिलेकडील नोटा घेतल्या आणि त्यापैकी काही रक्कम चलाखीने स्वतःकडे ठेवून उर्वरित पैसे परत दिले. या प्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावटाहात सरावली नाईकपाडा येथील लता प्रकाश दुबळा या ७ मार्च २०२६ रोजी स. सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या आत्या सासू सविता आहडी यांच्यासह डहाणू येथील सेंट्रल बँक शाखेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या.

सविता आहडी यांच्या खात्यातून ४७हजार रु. काढल्यानंतर दोघी बँकेच्या बाहेर खुर्चीवर बसल्या. त्यावेळी लता दुबळा यांनी काढलेली रक्कम मोजून पर्समध्ये ठेवली. याचवेळी सुमारे ३० वर्षे वयाचे २ अनोळखी इसम त्यांच्या शेजारी येऊन बसले. त्यापैकी एकाच्या चेहऱ्यावर दाढी वाढलेली होती. त्यांनी बँकेतून खोट्या नोटा दिल्या जात असल्याचे सांगत महिलांना नोटा तपासून पाहण्याचा सल्ला दिला. विश्वासात घेऊन त्यांनी लता दुबळा यांच्या हातातील नोटा घेतल्या. नोटा तपासण्याच्या बहाण्याने त्यांनी हातचलाखी करत ४७ हजार रुपयांपैकी १५ हजार रु. स्वतःकडे ठेवून घेतले आणि उर्वरित ३२ हजार रु. महिलेला परत दिले. दरम्यान, आरोपी तेथून निघून गेल्यानंतर संशय बळावल्याने लता दुबळा यांनी पैसे पुन्हा मोजले असता त्यांच्याकडे ३२ हजारच असल्याचे दिसून आले.

यानंतर त्यांनी तत्काळ सेंट्रल बैंक डहाणू शाखेत जाऊन चौकशी केली असता, त्यांच्याजवळ असलेली रक्कम ३२ हजारच असल्याचे स्पष्ट झाले. यावरून अज्ञात इसमांनी हातचलाखी करत १५ हजारांची फसवणूक केल्याचे उघड झाले. या प्रकरणी लता प्रकाश दुबळा यांनी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित २ अज्ञात इसमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डहाणू पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक किरण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार व्ही. एस. धारणे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Palghar crime news criminals in dahanu city woman robbed of rs 15000 with sleight of hand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 06:54 PM

Topics:  

  • palghar
  • palghar crime case
  • Robbery case

संबंधित बातम्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
1

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Washim: लाखोंचा ऐवज लंपास, एलसीबीच्या कारवाईत अट्टल घरफोड्या जेरबंद; घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Washim: लाखोंचा ऐवज लंपास, एलसीबीच्या कारवाईत अट्टल घरफोड्या जेरबंद; घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
3

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला
4

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.