
Palghar News
२०१० नंतर पालघर किनारपट्टीवर किमान ३० पेक्षा जास्त मोठे बोटी अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये किमान ४० हून अधिक मच्छिमारांचा मृत्यू, तर अनेकजण आजही बेपत्ता असल्याचे चित्र आहे. मार्च २०२५ मध्ये झाई गावाजवळ बोट उलटून चार मच्छिमारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याआधीही डहाणू, वसई आणि सफाळे किनारपट्टीवर अशा अनेक घटना घडल्या असून काही प्रकरणांत मृतदेहही सापडले नाहीत.
पालघर आणि लगतच्या किनारपट्टीवरील काही मच्छिमार चुकून आंतरराष्ट्रीय समुद्रसीमा ओलांडल्याने पाकिस्तानच्या ताब्यात गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये मच्छिमारांना महिनोन्महिने पाकिस्तानच्या तुरुंगात राहावे लागते. त्यांच्या सुटकेसाठी कुटुंबीयांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा राजनैतिक पातळीवर हस्तक्षेप झाल्यानंतरच या मच्छिमारांची मुक्तता होते.
स्थानिक संघटनेच्या अहवालानुसार गेल्या दशकात भारत-पाकिस्तान समुद्रसीमाजवळून मासेमारी करणारे शेकडो मच्छिमार पकडले गेले आहेत, ज्यात अनेक जण अजूनही कैदेत आहेत आणि काहींचा मृत्यू देखील झाला आहे. पाकिस्तानच्या जेलमध्ये १९४ भारतीय मच्छिमार असून त्यामध्ये पालघरचे १८ मच्छिमार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये पालघर जिल्ह्याच्या ८ मच्छिमारांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. तर सध्या २६ भारतीय मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. महाराष्ट्रातील मच्छिमार समाजाचे नेते, रामकृष्ण तांहेल यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेबाबत मच्छिमारांना ज्ञान नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. यासाठी भारत सरकारने आवश्यक उपाययोजना आखणे आवश्यक आहे.
तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह