वसई किल्ल्यावर चित्रीकरणाच्या नावाखाली हुल्लडबाजी; पुरातन वास्तूंचे नुकसान झाल्याने इतिहासप्रेमी नाराज (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
तब्बल ४६२ गर्भवतींचा मृत्यू…! पालघरमध्ये गर्भवतींच्या मृत्यूत वाढ; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
वसईतील ऐतिहासिक किल्ल्यात फ्रान्सिस्कन चर्चमधे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. आवश्यक नियमावली न पाळून शिलालेखा वर चूल लावून अन्नपदार्थ शिजवत असल्याचे आढळून आले. याबरोबरच या ऐतिहासिक वास्तूत विविध ठिकाणी सेट्स उभारून या वास्तूला हानी पोचवण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी काही महिला कलाकार अर्धनग्न अवस्थेत येथे धूम्रपान करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे इतिहास प्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. यापूर्वी सदर ठिकाणी अशाच स्वरूपाची घटना घडली होती.
कातारा टू या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. त्यावेळी याच पुरातन वास्तुत मोठ्या प्रमाणात कचरा करण्यात आला. पुरातत्व विभागावरत्ती मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर विभागाला खडबडून जाग आली होती याबाबत पुरातत्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे यांना विचारणा केली असता शुक्रवारच्या घडलेल्या घटने संदर्भात आपण पोलीस तक्रार देणार असून संबंधितांविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी सूचना देण्यात आल्याची माहिती दिली. वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यानी दिलेल्या माहितीत पुरातत्त्व विभागाकडून तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधितांविरोधात एफआयआर करण्यास अडचण निर्माण झालेली आहे. विभागाने तक्रार दिल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्णा धाडीगावकर यांनी दिली.
ऐतिहासिक वास्तू असलेल्या वसई किल्ल्यात शुक्रवारी चित्रीकरणाला परवानगी दिल्याने दुर्गप्रेमीनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारामुळे किल्ल्यातील वास्तूला हानी पोचत असून पावित्र्यही धोक्यात येत असल्याची चित्ता व्यक्त केली जात आहे. वसईचा ऐतिहासिक किल्ला यावास्तूची जतन आणि संवर्धन व्यवस्थित केले जात नसल्याने त्याला हानी पोचत आहे. तर किल्ल्यात होणारे प्रि वेडिंग शूटींगसह विविध चित्रीकरणांना परवानगी दिली जात असल्याने किल्ल्यात धिंगाणा सुरू असतो. किल्ल्याचे जतन करण्यासाठी अशा प्रकारांना बंदी घालण्याची मागणी दुर्गप्रेमींनी अनेकदा केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.






