
पालघरमध्ये बिबट्याचा वावर! ( सौजन्य - सोशल मीडिया )
वनपरिक्षेत्र अधिकारी रिता वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संबंधित गावांमध्ये जनजागृती मोहिम राबवली. यावेळी वनविभागाच्या रेस्क्यू टीमने ग्रामस्थांशी संवाद साधून बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.
लहान मुलांना घराबाहेर किंवा अंगणात एकटे सोडू नये. अंधार पडल्यानंतर मुलांनी निर्जन ठिकाणी, झाडी-झुडपांमध्ये किंवा शेत परिसरात खेळण्यासाठी जाऊ नये. ज्येष्ठ नागरिकांनी रात्री आणि पहाटेच्या वेळी एकट्याने निर्जन भागात जाणे टाळावे, असे वनविभागाने स्पष्ट केले आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी शक्यतो एकट्याने घराबाहेर पडणे टाळावे. घराचा परिसर, अंगण व गोठ्याजवळ पुरेसा प्रकाश ठेवावा. असेही सांगण्यात आले आहे.गावातील पशुधनाच्या सुरक्षेसाठी रात्रीच्या वेळी गायी, बैल, शेळ्या आदी जनावरे उघड्यावर न बांधता सुरक्षित व बंदिस्त गोठ्यात ठेवावीत. गोठ्याच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
नागरिकांनी स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता जपत वन्यजीवाला कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी. बिबट्याच्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे सफाळे वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
परिसरात बिबट्याचा वावर आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. बिबट्याला स्वतःहून पकडण्याचा किंवा हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये. बिबट्या आढळल्यास तातडीने महाराष्ट्र वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Ans: पालघर तालुक्यातील मथाणे, एडवण, उसरणी व घाटीम परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या पार्श्वभूमीवर इशार दिला आहे.
Ans: बिबट्या आढळल्यास तातडीने महाराष्ट्र वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.