
फोटो सौजन्य सोशल मिडिया
पालघरच्या जिनिअस पेंट्स कलर कंपनीला आग लागल्याची घटना घडली होती, ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून सदर घटनेवेळी कंपनीत अनेक कामगार उपस्थित होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या कंपनीच्या बाजूला गावातील रहिवाशांची घरं देखील आहेत.
पालघरच्या वाड्यातील जीनियस कलर कंपनीच्या भीषण आगीमध्ये कंपनीत केमिकलचा भडका उडाल्याने आगीने रौद्र रूप धारण केले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. वाडा पोलिसांकडून सात टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीमुळे कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पालघर जिल्ह्यातील दिनकर पाडा इथल्या एका कलर कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली, या घटने मध्ये जिनियस पेंटस कलर कंपनीला भिषण आग लागली असून या घटने मध्ये कोणतीही जिवित हानी झालेली नाही, पण कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटने मध्ये जिनियस पेंटस कलर कंपनीच्या बाजुला गावातील घरांचे नुकसान झाले असून गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
समस्या सुटली नाही तर वाहनांची तोडफोड… कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीवरून मनसे आक्रमक