
मुंबईच्या हवेने दिल्लीलाही मागे टाकले! ( सौजन्य - Chatgpt )
ऑक्टोबर महिनाअखेर मुंबईने देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी असणाऱ्या दिल्लीला मागे टाकले होते. महिना बदलला तरी परिस्थितीत फरक पडलेला नाही. उलट दिवसा कडक ऊन आणि रात्री काही प्रमाणात गारवा अशी स्थिती गेल्या काही दिवसांपासून सुरू झाल्याने त्याचा परिणाम रहिवाशांवर होत आहे. यात ‘वाहतूक पोलिस’ हा घटक सर्वाधिक बाधित होत आहे. या समस्येबाबत दै. ‘नवराष्ट्र’ ने शहरात विविध ठिकाणच्या वाहतूक पोलिसांना बोलते केले असता सर्दी, पडसे, खोकला सामान्य झालेच आहेत, मात्र छातीत दुखणे, नाक-घसा खवखवणे, अनेक दिवस न थांबणारा खोकला याने बेहाल झाल्याचे काही वाहतूक पोलिसांनी सांगितले. सर्व प्रसिद्धी माध्यमांतून मुंबईतील खराब हवेबाबत बातम्या येत आहेत, समाजमाध्यमातून तज्ज्ञांनी दिलेले इशारे, लेख येत आहेत.
यंदा ऑक्टोबरमध्ये मुंबईतील वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ऑक्टोबर महिन्यातील बहुतांश दिवशी मुंबईने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकले होते. जागतिक स्तरावर ‘आयक्यू एअर’च्या अहवालानुसार, मुंबई जगातील तिसरे सर्वात प्रदूषित शहर ठरले होते, जिथे हवेचा गुणवता निर्देशांक (AQI) १६६ ते २०० च्या दरम्यान नोंदवला गेला.
मुंबई आणि उपनगरे मिळून १०२ बिटचौकी असून ३ हजारपेक्षा अधिक वाहतूक पोलिस कर्तव्य बजावतात, हेच वाहतूक पोलिस शहरातील रोज २७ लाख वाहनांचे वाहतूक नियंत्रण करतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात १२९ ठिकाणी प्रदूषण हॉट स्पॉट असून ३० पेक्षा अधिक ठिकाणी शासनाचेच विविध प्रकल्प सुरू आहेत. ज्यामुळे धूळ प्रदूषणात प्रचंड वाढ होत आहे.
Ans: ८ ते १० तास रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या मुंबईच्या वाहतूक पोलिसांना याचा सर्वाधिक फटका बसत असून त्यांना श्वसनविकार जडले आहेत.
Ans: ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवेच्या गुणवत्तेने धोक्याची पातळी गाठली आहे. AQI १६६ ते २०० मध्ये पोहोचला आहे. काही दिवस मुंबईने प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीलाही मागे टाकले होते.
Ans: मुंबई आणि उपनगरांमध्ये ३ हजारपेक्षा अधिक वाहतूक पोलिस कर्तव्य बजावतात आणि ते शहरातील रोज २७ लाख वाहनांचे नियंत्रण करतात.