Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nalasopara Navratri Violence : नालासोपाऱ्यात नवरात्रोत्सवाला गालबोट! दोन गटांत तुफान हाणामारी, महिलांसह 10 जण जखमी

Nalasopara Navratri Violence : नालासोपारा पूर्वेकडील अचोळे परिसरातील नवरात्रोत्सवादरम्यान रविवारी रात्री दोन गटांत झालेल्या हिंसक संघर्षामुळे आणि दगडफेकीमुळे परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे. एका अरुंद रस्त्यावरून झालेला किरकोळ वाद एवढा वाढला की, दोन्ही बाजूंनी काठ्या, बांबू आणि दगडांनी तुफान हाणामारी करण्यात आली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 13, 2026 | 11:38 AM
नालासोपाऱ्यात दोन गटांत हाणामारी ( सौजन्य - Chatgpt )

नालासोपाऱ्यात दोन गटांत हाणामारी ( सौजन्य - Chatgpt )

Follow Us
Follow Us:
  • नालासोपाऱ्यात दोन गटांत हाणामारी
  • दगडफेकीत १० जण जखमी
  • नवरात्रोत्सवाला लागले वादाचे गालबोट
Nalasopara Navratri Violence : नालासोपारा पूर्वेकडील अचोळे मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सवादरम्यान रविवारी रात्री दोन गटांत झालेल्या हिंसक संघर्षाने संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अरुंद रस्त्यावरून सुरू झालेल्या क्षुल्लक वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली तसेच काठ्या व बांबूने हल्ला चढवण्यात आला. या घटनेत सुमारे १० जण जखमी झाले आहेत. ( Nalasopara Navratri Violence ) 

Vasai Road Terminus : पश्चिम रेल्वेचा महत्त्वाकांक्षी विस्तार! वसई रोड टर्मिनसच्या कामाला वेग, कधीपर्यंत पूर्ण होणार काम

अचोळे भागात नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना एका अरुंद रस्त्यावरून दुचाकीस्वार आणि टेम्पो चालकामध्ये बाचाबाची झाली रस्त्यावर गर्दी आणि जागेचा अभाव असल्याने हा वाद अधिक वाढला. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत दुचाकीस्वाराला मारहाण करून तेथून हाकलून लावल्याचा आरोप आहे. या अपमानाचा बदला घेण्यासाठी संबंधित दुचाकीस्वार काही वेळातच आपल्या समर्थकांसह घटनास्थळी परत आला.

दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा

दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा सुरू झाला. हल्लेखोरांनी काठ्या, बांबू आणि दगडांच्या साहाय्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आणि उपस्थितांवर हल्ला चढवला. या संघर्षात अनेक नागरिक जखमी झाले. जखमींना तातडीने वसई-विरार महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी उशिरा रात्री हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

महिलेसह अनेक नागरिक जखमी

या घटनेबाबत दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. जखमी मंडळ सदस्य विशाल सिंग यांनी आरोप केला की, कृष्णा नावाच्या दुचाकीस्वाराने वाद घातल्यामुळे त्याला हटकण्यात आले होते. मात्र, तो १० ते १५ जणांना घेऊन आला आणि त्यांनी तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात मंडळाच्या मूर्तीचेही नुकसान झाले. या हाणामारीत एका महिलेसह अनेक निष्पाप नागरिकही जखमी झाले आहेत.

रस्ता अरुंद असल्याने टेम्पो चालकाशी वाद, मारहाण केली

दुसऱ्या बाजूने, दुचाकीस्वार कृष्णाचा मित्र शिव यादव याने सांगितले की, मंडळाने रस्त्यावर पुरेशी जागा सोडली नव्हती. रस्ता अरुंद असल्याने टेम्पो चालकाशी वाद झाला, ज्यामध्ये मंडळ सदस्यांनी कृष्णाला मारहाण केली. आम्ही केवळ याचा जाब विचारण्यासाठी तिथे गेलो होतो. नवरात्रीच्या सुरुवातीलाच घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात भीती पसरली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.

Vasai Virar News : राज्यस्तरीय Kabaddi Tournament वादाच्या भोवऱ्यात! निमंत्रण पत्रिकेवरून राजकीय वाद; भाजपकडून बहिष्कार

Web Title: Nalasopara navratri clash stone pelting 10 injured police investigation ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • nalasopara news
  • Navaratri

संबंधित बातम्या

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral
1

Navratri 2026: गरबा लूकसाठी पार्लर अन् फोटोशूटचा खर्च कशाला? Google Gemini वापरून बनवा भन्नाट फोटो, सोशल मीडियावर व्हाल Viral

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! प्राचीने सांगितले दुर्मीळ जलचरांचे थक्क करणारे अनुभव
2

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! प्राचीने सांगितले दुर्मीळ जलचरांचे थक्क करणारे अनुभव

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?
3

Health Tips: डायबिटीज-बीपीचा त्रास आहे? नवरात्रीचा उपवास करताना रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.