Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! प्राचीने सांगितले दुर्मीळ जलचरांचे थक्क करणारे अनुभव

Exclusive Navarashtra-Navadurga: समुद्रातील दुर्मीळ आणि शांत स्वभावाचा डुगाँग अर्थात 'समुद्री गाय' या प्राण्याच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या सागरी संशोधिका प्राची यांनी नवभारत नवराष्ट्रच्या 'नवदुर्गा' विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या संशोधनाचा रोमांचक प्रवास उलगडला. समुद्राखालची दुनिया नेमकी कशी अशी असते? जाणून घ्या...

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 13, 2026 | 09:11 AM
समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! समुद्री गाय आणि द्वारकेचा संबंध काय? प्राचीने उलगडली खोल समुद्रातील अद्भुत रहस्ये

समुद्राच्या पोटात दडलंय अनोखं विश्व! समुद्री गाय आणि द्वारकेचा संबंध काय? प्राचीने उलगडली खोल समुद्रातील अद्भुत रहस्ये

Follow Us
Follow Us:
  • समुद्राखालची दुनिया पाहून थक्क व्हाल!
  • समुद्रातील ‘जलपरी’ वाचवण्यासाठी प्राचीची धडपड
  • ‘जलपरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डुगाँगची अनोखी कहाणी प्राचीच्या शब्दांत
Exclusive Navarashtra-Navadurga: अथांग समुद्र, त्याच्या खोल पाण्यात दडलेले असंख्य जीव आणि त्यांच्याभोवती असलेले गूढ जग प्रत्येकालाच आकर्षित करते. मात्र, या समुद्राच्या अंतरंगात जाऊन दुर्मीळ सागरी प्राण्यांचा अभ्यास करणे आणि त्यांच्या अस्तित्वासाठी लढा देणे हे मोठ्या धाडसाचे काम आहे. सागरी संशोधिका प्राची यांनी हेच आव्हान स्वीकारले आहे. समुद्रातील अत्यंत शांत आणि दुर्मीळ डुगाँग अर्थात ‘समुद्री गाय’ या प्राण्याच्या संवर्धनासाठी त्या संशोधन करत आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त नवभारत नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्या संशोधनातील अनुभव, समुद्राखालील आव्हाने आणि डुगाँगच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.

डुगाँग म्हणजे नेमका कोणता प्राणी?

डुगाँग हा समुद्रात राहणारा सस्तन प्राणी आहे. त्याला ‘सी काऊ’ अर्थात समुद्री गाय असेही म्हटले जाते. हा प्राणी प्रामुख्याने समुद्रातील गवतावर जगतो. प्राची यांनी सांगितले की, डॉल्फिनप्रमाणे डुगाँग समुद्राच्या पृष्ठभागावर उड्या मारत नाही. श्वास घेण्यासाठी तो काही वेळाने पाण्याच्या पृष्ठभागावर येतो आणि पुन्हा समुद्रात निघून जातो. बोटींचा आवाज ऐकल्यानंतरही तो दूर जाण्याचा प्रयत्न करतो. डुगाँगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या शरीराची रचना. त्याच्या शेपटीच्या आकारामुळे पूर्वीच्या काळात खलाशांना तो जलपरीसारखा दिसायचा. त्यामुळे जलपरीच्या कथांचा संबंध डुगाँगशी जोडला जात असल्याचे प्राची यांनी सांगितले.

Exclusive Navarashtra-Navadurga: लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली अन् झाडांच्या प्रेमात पडली! माधुरीने उभारला ‘वृक्षवल्ली’चा डोलारा

अनेक वर्षांच्या संशोधनानंतर डुगाँगचे पहिले दर्शन

गुजरातच्या समुद्रात संशोधन करत असताना घडलेला एक अविस्मरणीय प्रसंग प्राची यांनी शेअर केला. गुजरातमधील समुद्री बेटांवर आणि प्रवाळ खडकांच्या परिसरात त्यांची संशोधन टीम काम करत होती. ओहोटीच्या वेळी काही बेटांभोवतीचे पाणी ओसरल्यानंतर समुद्री गवताचे क्षेत्र दिसू लागले. त्या वेळी संशोधकांना समुद्री गवत आणि मातीचे नमुने गोळा करण्यासाठी मर्यादित वेळ मिळायचा. अशाच एका दिवशी प्राची नमुने गोळा करण्याचे काम करत होत्या. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्याने ड्रोनच्या मदतीने समुद्राचे निरीक्षण सुरू केले होते. अचानक त्याने प्राची यांना बोलावले आणि ड्रोनच्या स्क्रीनवर दिसणारा एक सागरी प्राणी दाखवला.तो प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून डुगाँग होता! प्राची यांच्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील त्यांच्या संशोधनादरम्यान मिळालेला हा डुगाँगचा पहिला छायाचित्रात्मक पुरावा होता. विशेष म्हणजे, ज्या प्राण्याच्या संवर्धनासाठी त्या तीन ते चार वर्षे काम करत होत्या, तो प्राणी त्यांनी तोपर्यंत प्रत्यक्ष पाहिलाच नव्हता.

‘ज्या प्राण्यावर संशोधन करतेय, तो आजही अस्तित्वात आहे!’

या अनुभवाबद्दल बोलताना प्राची यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक स्थानिक लोकांनी त्यांना डुगाँग आता या भागात दिसत नसल्याचे सांगितले होते. काहींनी तर अनेक वर्षांपूर्वी डुगाँग पाहिल्याच्या आठवणी सांगत संशोधनावर वेळ वाया घालवू नका, असा सल्लाही दिला होता. मात्र, ड्रोनच्या माध्यमातून डुगाँगचा पुरावा मिळाल्यानंतर त्यांच्या संशोधनाला नवी दिशा मिळाली. हा क्षण आपल्या संशोधनातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रातील प्रदूषण आणि इतर धोक्यांनंतरही हा दुर्मीळ प्राणी त्या परिसरात अस्तित्वात असल्याचे पाहून त्यांना मोठा आनंद झाला.

डुगाँगच्या संवर्धनासाठी समुद्री गवताचे संरक्षण महत्त्वाचे

डुगाँगच्या संवर्धनासाठी त्याच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे प्राची यांनी स्पष्ट केले. डुगाँग हा प्रामुख्याने समुद्री गवतावर अवलंबून असतो. त्यामुळे समुद्री गवताचे क्षेत्र नष्ट झाल्यास त्याच्या अन्नसाखळीवर परिणाम होऊ शकतो. समुद्रातील प्रदूषण, मानवी हस्तक्षेप आणि अधिवासातील बदल यांसारख्या धोक्यांचा अभ्यास संशोधकांकडून केला जातो. डुगाँगला एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवून त्याचे संवर्धन करणे सोपे नाही. त्यामुळे तो ज्या नैसर्गिक परिसरात राहतो, त्या परिसराचे संरक्षण करणे हा अधिक महत्त्वाचा मार्ग असल्याचे प्राची यांनी सांगितले.

भारतात डुगाँगची संख्या किती?

भारतात गुजरात, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांच्या समुद्री परिसरात डुगाँग आढळतो. प्राची यांनी सांगितले की, पूर्वी डुगाँगच्या संख्येबाबत उपलब्ध असलेली माहिती अनेकदा स्थानिक लोकांच्या मुलाखती आणि निरीक्षणांवर आधारित होती. त्यामुळे त्यांची अचूक संख्या निश्चित करणे संशोधकांसाठी मोठे आव्हान होते. तामिळनाडूतील एका अभ्यासात २७० डुगाँगची नोंद झाल्याचा उल्लेख केला. मात्र, भारतातील सर्व डुगाँगची एकत्रित आणि अद्ययावत संख्या निश्चित करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.डुगाँग हा अंदमान निकोबारचा राज्य प्राणी आहे.

डुगाँग एकमेकांशी संवाद कसा साधतात?

डुगाँगच्या जीवनशैलीतील आणखी एक रंजक बाब म्हणजे त्यांची संवाद साधण्याची पद्धत. प्राची यांच्या माहितीनुसार, डुगाँग विविध प्रकारचे आवाज काढून एकमेकांशी संपर्क साधतात. त्यामध्ये चिवचिवाटासारख्या आवाजांचाही समावेश असतो. पाण्यात आवाज वेगाने प्रवास करत असल्यामुळे या आवाजांच्या मदतीने डुगाँग एकमेकांशी संवाद साधू शकतात. डुगाँगची मादी आपल्या पिल्लाची दीर्घकाळ काळजी घेते. पिल्लू मोठे होईपर्यंत आई त्याला दूध पाजते आणि कालांतराने पिल्लू समुद्री गवत खाण्यास सुरुवात करते.

समुद्राखालील संशोधनासाठी विशेष प्रशिक्षण

समुद्री जीवांचा अभ्यास करायचा असेल, तर केवळ प्रयोगशाळेत बसून संशोधन करून चालत नाही. प्रत्यक्ष समुद्रात उतरून त्यांच्या अधिवासाचे निरीक्षण करावे लागते. प्राची यांनी सांगितले की, समुद्राखाली संशोधन करण्यासाठी त्यांनी पोहणे शिकण्यास सुरुवात केली आणि डायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. समुद्रातील भरती-ओहोटी, मर्यादित वेळेत नमुने गोळा करणे, समुद्री गवताचे निरीक्षण आणि सागरी प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास करणे ही कामे संशोधनाचा महत्त्वाचा भाग आहेत.

‘नवदुर्गा’ पॉडकास्टमधून सागरी संवर्धनाचा संदेश

नवभारत नवराष्ट्रच्या ‘नवदुर्गा’ विशेष पॉडकास्टमधून प्राची यांनी सागरी जीवांच्या संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. दुर्मीळ प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांची जीवनशैली, अधिवास, अन्न आणि त्यांच्यासमोरील धोके समजून घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. समुद्रातील एखाद्या प्राण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी केवळ त्या प्राण्याचे संरक्षण पुरेसे नसते, तर संपूर्ण सागरी परिसंस्थेचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे असते. समुद्राच्या अथांग पाण्यात दुर्मीळ डुगाँगचा शोध घेणाऱ्या प्राची यांचा प्रवास हा जिद्द, संशोधनाची आवड आणि पर्यावरण संवर्धनासाठीच्या समर्पणाचे उदाहरण ठरतो.

Exclusive Navarashtra-Navadurga: वडिलांची शेवटची इच्छा अन् एका ऑडिशनने बदललं कृतीचे नशीब! भन्सालींची पहिली संधी हुकली पण….

Web Title: Marine biologist prachi dugong conservation research sea cow navdurga special podcast sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 09:11 AM

Topics:  

  • NAVARASHTRA
  • Navarashtra Exclusive
  • Navaratri

संबंधित बातम्या

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?
1

Raigad News: श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरील ओपन जिमला गंज! नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर, दुरुस्ती कधी होणार?

Chandrapur News: दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का? राजुरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त
2

Chandrapur News: दुर्घटनेनंतरच प्रशासन जागे होणार का? राजुरातील बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे नागरिक त्रस्त

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ
3

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘मंगरोल’ युद्धनौका दाखल; सागरी सुरक्षेला मिळणार बळ

RTO च्या गाड्यांवर कॅमेरे बसवा, अन्यथा… सुधाकर गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा!
4

RTO च्या गाड्यांवर कॅमेरे बसवा, अन्यथा… सुधाकर गायकवाड यांचा प्रशासनाला इशारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.