Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News: ‘सरकार तुपाशी, आम्ही उपाशी!’ पोषणाआहारासाठी विद्यार्थ्यांनी हातात घेतल्या रिकाम्या थाळ्या; श्रमजीवी संघटनेचा मोर्चा

Palghar News : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला तरी पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचा धान्यपुरवठा रखडला आहे. याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्रवारी विद्यार्थ्यांनी हातात रिकाम्या थाळ्या घेऊन पंचायत समिती कार्यालयांवर धडक मारली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 01, 2026 | 11:40 AM
(फोटो सौजन्य: Chatgpt)

(फोटो सौजन्य: Chatgpt)

Follow Us
Follow Us:
  • श्रमजीवी संघटनेचा पालघरमध्ये ताटली मोर्चा
  • ‘सरकार तुपाशी, आम्ही उपाशी’चा ‘आवाज’
  • विद्यार्थ्यांनी हातात घेतल्या रिकाम्या थाळ्या
Palghar News : शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा नियमित पुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्रवारी पालघर (Palghar News), ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांवर आंदोलन करण्यात आले. हातात रिकाम्या थाळ्या घेऊन विद्यार्थ्यांनी सरकार खाते तुपाशी, आम्ही राहतो उपाशी! अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनाचे नेतृत्व श्रमजीवी यांच्यासह विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले, विद्यार्थ्यांच्या मोठ्‌या सहभागामुळे प्रशासनाने आंदोलनाची तातडीने दखल घेतली.

Nalasopara News : मोठ्ठा घोळ… गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विमा घोटाळा, 17 हेल्थ क्लेमद्वारे कंपनीची फसवणूक

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना उलटला असला, तरी पालघर, नाशिक, ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेसाठी आवश्यक तांदूळ आणि इतर धान्याचा पुरवठा अद्याप झालेला नाही. परिणामी विद्यार्थ्यांच्यापोषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामीण व आदिवासी भागातील अनेक शाळांमध्ये धान्यसाठा संपत आल्याने मध्यान्ह भोजन योजना विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही शाळांमध्ये फेब्रुवारीपूर्वीचे धान्य अजूनही वापरले जात आहे. नियमानुसार जुना साठा परत घेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना त्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या ताटात निकृष्ट दर्जाचे धान्य जात असल्याचीही तक्रार केली जात आहे.

शाळांमध्ये शिक्षकांनी स्वतःच्या खर्चातून मध्यान्ह

पालघर जिल्ह्यातील शाळांना अखेरचा धान्यपुरवठा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आला होता. त्यानंतर उन्हाळी सुट्ट्या, पावसाळ्यामुळे मिळालेल्या आपत्कालीन सुट्टया आणि विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती यामुळे काही शाळांमध्ये जुना धान्यसाठा शिल्लक होता. त्याच साठ्यावर जून आणि जुलै महिना कसा-बसा निभावून नेण्यात आला. काही शाळांमध्ये शिक्षकांनी स्वतःच्या खर्चातून मध्यान्ह भोजन सुरू ठेवले, तर काही ठिकाणी धान्य काटकसरीने वापरण्यात आले. मात्र आता बहुतांश शाळांमधील धान्यसाठा पूर्णपणे संपत आला आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

विद्यार्थी उपस्थितीवर परिणाम होण्याची भीती

पालघरसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात मध्यान्ह भोजन केवळ सरकारी योजना नसून अनेक विद्यार्थ्यांसाठी दिवसातील सर्वात पौष्टिक आणि खात्रीचे जेवण असते. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी कुटुंबांतील मुलांच्या पोषणासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. अशा परिस्थितीत धान्यपुरवठा रखडल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याबरोबरच शाळेतील उपस्थितीवरही परिणाम होण्याची भीती असल्याचे श्रमजीवी संघटनेचे राज्य सरचिटणीस विजय जाधव यांनी सांगितले.

एकाचवेळी पंचायत समिती कार्यालयांवर धडक

या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेने शुक्रवारी एकाच वेळी पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्हयातील पंचायत समिती कार्यालयांवर विद्याथ्यांसह ताटली मोर्चा काढून प्रशासनाला हादरवून सोडले, या आंदोलनाची त्वरीत दखल घेत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी संबंधित पुरवठादाराला तत्काळ पोषण आहाराचा पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले.

जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

भिवंडीतील आंदोलनादरम्यान ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून धान्य पुरवठा त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत श्रमजीवी संघटनेने विद्याथ्यर्थ्यांना नियमित, सकस व दर्जेदार पोषण आहार मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, शासनाने हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी केली आहे.

Palghar Flood: अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर! 7 हजारांहून अधिक कुटुंबांना आर्थिक मदत; 3.66 कोटी थेट खात्यात

Web Title: Palghar news school nutrition diet delay students protest empty plates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • Marathi News
  • Marathi School
  • palghar
  • Palghar news

संबंधित बातम्या

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!
1

North Korea Missile : जपानच्या समुद्रात उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; काही तासांत दोन मिसाईल डागली!

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!
2

Food History : समोसा-जलेबीपासून बिर्याणीपर्यंत; भारताचे वाटतात, पण मुळं आहेत परदेशात!

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!
3

Ed Sheeran : गाण्यांचा बादशहा बोलला अन् सभागृह शांत झालं! गाझाच्या परिस्थितीवर एड शीरनचा थेट वार!

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!
4

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.