Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित

Palghar Ration Card e-KYC Update : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या रेशनकार्ड e-KYC मोहीम पूर्ण करण्यासाठी ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात अद्याप ३ लाख ५९ हजार हून अधिक कार्डधारकांची केवायसी प्रलंबित असून मुदतीत पडताळणी न केल्यास मासिक धान्यपुरवठा खंडित केला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 29, 2026 | 12:07 PM
ई-केवायसीसाठी अखेरची संधी ( सौजन्य - सोशल मीडिया )

ई-केवायसीसाठी अखेरची संधी ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ई-केवायसीसाठी अखेरची संधी
  • जिल्ह्यात ३.५९ लाख शिधापत्रिकाधारक अजूनही प्रलंबित
  • ३० सप्टेंबर देण्यात आली अंतिम तारीख
Palghar Ration Card e-KYC Update : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बोगस लाभाथ्यर्थ्यांना चाप लावण्यासाठी सुरू करण्यात आलेली ई-केवायसी मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पालघर जिल्ह्यात तब्बल ८० टक्के काम पूर्ण झाले असले तरी, अद्याप साडेतीन लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी आपली पडताळणी पूर्ण केलेली नाही. ३० सप्टेंबर ही यासाठीची अंतिम मुदत असून, या मुदतीत नोंदणी न करणाऱ्या नागरिकांचा मासिक धान्यपुरवठा खंडित केला जाऊ शकतो, असा इशारा पुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे. ( Palghar Ration Card e-KYC Update ) 

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

जिल्ह्यात मार्च २०२५ च्या नोंदीनुसार ९ लाखांहून अधिक कार्डधारकांची पडताळणी शिल्लक होती. पुरवठा विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण १७ लाख ९५ हजार ७२९ उद्दिष्टांपैकी १४ लाख ३६ हजार ६०८ नागरिकांची ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. उर्वरित ३ लाख ५९ हजार १२१ लाभाथ्यर्थ्यांना शेवटची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांवर याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. वसई तालुक्यात सर्वाधिक १ लाख ३ हजार ६४३ शिधापत्रिका धारकांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही. तर मोखाडा तालुक्यातील फक्त १८ हजार ८५१ शिधापत्रिकाधारकांची केवायसी प्रलंबित आहे.

पडताळणीसाठी सुलभ पर्याय

रास्त भाव दुकानांवर थेट सुविधाः लाभार्थी आपल्या नजीकच्या रेशन दुकानात ओळख पुराव्यासह जाऊन ई-पॉस (e-POS) यंत्रावर बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) प्रमाणीकरण करून घेऊ शकतात. – मोबाइल इच्छिणारे नागरिक गुगल प्ले स्टोअरवरून MERA अॅपद्वारे घरबसल्या सोयः तंत्रज्ञानाचा वापर करू e-KYC किंवा Face eKYC हे अधिकृत अॅप डाऊनलोड करून स्वतःचा चेहरा स्कॅन करून थेट ई-केवायसी पूर्ण करू शकतात.

घरबसल्या अॅपवरून करता येणार केवायसी

शिधापत्रिकाधारकांनी संबंधित रेशन दुकानावर जाऊन केवायसी करायची आहे. किंवा घरबसल्या अधिकृत अॅपवरून केवायसी करता येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

पालघरचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले थेट म्हणाल्या की,  “शासनाच्या  नियमानुसार रेशन वाटप प्रणालीतील पारदर्शकतेसाठी ही पडताळणी बंधनकारक आहे. अंतिम मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने ३० सप्टेंबरपूर्वी प्रत्येक लाभार्थ्याने आपली ई-केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यातील नियमित धान्यपुरवठा अखंडित राहील.”

तालुकानिहाय प्रलंबित

तालुका प्रलंबित लाभार्थी संख्या
वसई १,०३,६४३ (सर्वाधिक)
डहाणू ६९.३९३
पालघर ५७,४३५
वाडा ३१,८०९
जव्हार ३९,७३२
विक्रमगड २३,५९२
तलासरी २२.६२६
मोखाडा १८,८५१ (सर्वात कमी)
एकूण  ३,५९.१२१

घरबसल्या अॅपवरून करता येणार केवायसी

शिधापत्रिकाधारकांनी संबंधित रेशन दुकानावर जाऊन केवायसी करायची आहे. किंवा घरबसल्या अधिकृत अॅपवरून केवायसी करता येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

Web Title: Palghar ration card ekyc last date 30 september how to do online marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • e-KYC
  • palghar
  • Ration Card

संबंधित बातम्या

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित
1

Palghar Drought Relief Controversy : पालघरला सरकारने दुष्काळातून का वगळले? आदिवासी शेतकरी मदतीपासून वंचित

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?
2

LPG e-KYC News : तुमचाही गॅस सिलिंडर बंद झालाय का? e-KYC आणि पुरवठा संकटामुळे 62 लाख कनेक्शन ब्लॉक, आता काय?

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
3

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
4

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.