
वाढवण बंदराच्या कामांना गती ( सौजन्य - सोशल मीडिया )
…अन्यथा धान्य बंद होणार! e-KYC साठी अखेरची संधी; जिल्ह्यात 3.59 लाख Ration Card धारक अजूनही प्रलंबित
केंद्रीय सचिवांनी भेटीदरम्यान किनाऱ्यालगतच्या समुद्रातील भरावाचे काम, समुद्राच्या लाटा रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ब्रेकवॉटरची उभारणी, बंदराला जोडणारे बाह्य दळणवळणाचे महामार्ग व रेल्वे जाळे, भूसंपादन प्रक्रिया आणि वीज-पाण्यासारख्या पायाभूत उपयुक्तता सेवांच्या प्रगतीची बारकाईने तपासणी केली.
व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल म्हणाले, “केंद्रीय सचिवांच्या या महत्वपूर्ण दौऱ्यामुळे आणि त्यांनी घेतलेल्या सविस्तर आढाव्यामुळे वाढवण प्रकल्पाच्या कामाना निश्चितच नवी गती मिळेल. प्रकल्पाचे प्रत्येक काम पूर्वयोजनेनुसार वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, प्रत्येक टप्प्यावर उच्च दर्जाचे तांत्रिक निकष, पर्यावरणीय शाश्वतता आणि कार्यान्वयनाची सज्जता यांना सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे”.
आगामी टप्प्यांमध्ये नियोजित असलेल्या कामांची रूपरेषा व्हीपीपीएलच्या तांत्रिक पथकाने त्यांच्यासमोर सादर केली. प्रकल्पाची अंमलबजावणी निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि भागधारकांमध्ये घनिष्ठ समन्वय असणे अत्यावश्यक असल्याचे विजय कुमार यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाची इतर पूरक कामे एकाच वेळी समांतरपणे पुढे नेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बांधकामाच्या व्यापक टप्प्याला सुरुवात करण्यापूर्वी कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचण उरता कामा नये, यादृष्टीने सुरू असलेल्या पूर्वतयारीचीही त्यांनी खातरजमा केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध भागधारकांशी थेट संवाद साधून त्यांचे पाहणी दौऱ्यावेळी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा व्हीपीपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौरव दयाल, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, व्हीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविश कुमार सिंह यांच्यासह विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.