ई-केवायसीसाठी अखेरची संधी ( सौजन्य - सोशल मीडिया )
जिल्ह्यात मार्च २०२५ च्या नोंदीनुसार ९ लाखांहून अधिक कार्डधारकांची पडताळणी शिल्लक होती. पुरवठा विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण १७ लाख ९५ हजार ७२९ उद्दिष्टांपैकी १४ लाख ३६ हजार ६०८ नागरिकांची ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. उर्वरित ३ लाख ५९ हजार १२१ लाभाथ्यर्थ्यांना शेवटची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व रास्त भाव धान्य दुकानांवर याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. वसई तालुक्यात सर्वाधिक १ लाख ३ हजार ६४३ शिधापत्रिका धारकांनी अद्याप केवायसी पूर्ण केलेली नाही. तर मोखाडा तालुक्यातील फक्त १८ हजार ८५१ शिधापत्रिकाधारकांची केवायसी प्रलंबित आहे.
रास्त भाव दुकानांवर थेट सुविधाः लाभार्थी आपल्या नजीकच्या रेशन दुकानात ओळख पुराव्यासह जाऊन ई-पॉस (e-POS) यंत्रावर बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) प्रमाणीकरण करून घेऊ शकतात. – मोबाइल इच्छिणारे नागरिक गुगल प्ले स्टोअरवरून MERA अॅपद्वारे घरबसल्या सोयः तंत्रज्ञानाचा वापर करू e-KYC किंवा Face eKYC हे अधिकृत अॅप डाऊनलोड करून स्वतःचा चेहरा स्कॅन करून थेट ई-केवायसी पूर्ण करू शकतात.
शिधापत्रिकाधारकांनी संबंधित रेशन दुकानावर जाऊन केवायसी करायची आहे. किंवा घरबसल्या अधिकृत अॅपवरून केवायसी करता येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.
पालघरचे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी सीमा महल्ले थेट म्हणाल्या की, “शासनाच्या नियमानुसार रेशन वाटप प्रणालीतील पारदर्शकतेसाठी ही पडताळणी बंधनकारक आहे. अंतिम मुदत संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने ३० सप्टेंबरपूर्वी प्रत्येक लाभार्थ्याने आपली ई-केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यातील नियमित धान्यपुरवठा अखंडित राहील.”
तालुकानिहाय प्रलंबित
| तालुका | प्रलंबित लाभार्थी संख्या |
|---|---|
| वसई | १,०३,६४३ (सर्वाधिक) |
| डहाणू | ६९.३९३ |
| पालघर | ५७,४३५ |
| वाडा | ३१,८०९ |
| जव्हार | ३९,७३२ |
| विक्रमगड | २३,५९२ |
| तलासरी | २२.६२६ |
| मोखाडा | १८,८५१ (सर्वात कमी) |
| एकूण | ३,५९.१२१ |
शिधापत्रिकाधारकांनी संबंधित रेशन दुकानावर जाऊन केवायसी करायची आहे. किंवा घरबसल्या अधिकृत अॅपवरून केवायसी करता येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.






