Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Government Subsidy : PM Kisanच्या 25 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! ‘या’साठी सरकार देणार तब्बल 62 हजार कोटी

Central Government Subsidy : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २५ व्या हप्त्यापूर्वी केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. केंद्राच्या मंत्रिमंडळाने खतांच्या उपलब्धतेसाठी आणि किमती नियंत्रित ठेवण्यासाठी तब्बल ६२,३७० कोटी रुपयांच्या भरभक्कम सब्सिडीला मंजुरी दिली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 11, 2026 | 05:21 PM
PM Kisanच्या 25 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

PM Kisanच्या 25 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • PM Kisanच्या 25 व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोठी भेट!
  • ‘या’साठी सरकार देणार तब्बल 62 हजार कोटी
  • शेतकऱ्यांसाठी कोणता खास निर्णय?
Central Government Subsidy : पंतप्रधान किसान योजनेच्या २५ व्या हप्त्याच्या आधी, सरकारने शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी, केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबत एक मोठी घोषणा केली. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. नेमकी काय आहे ही योजना आणि यातून शेतकऱ्यांना नेमका कोणता फायदा होणार आहे? सगळं सविस्तर जाणून घेऊयात. ( Central Government Subsidy ) 

Financial News: गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सरकारी योजनेत मिळतोय भरघोस परतावा…

शेतकऱ्यांसाठी कोणता खास निर्णय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. रबी हंगामासाठी ६२,३७० कोटी रुपयांच्या खत अनुदानास मंजुरी दिली. किसान योजनेचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला.२०२६-२७ च्या रबी हंगामासाठी (ऑक्टोबर २०२६ ते ३१ मार्च २०२७) फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (पी अँड के) खतांवरील पोषक तत्त्व आधारित अनुदान (एनबीएस) दर निश्चित करण्याच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याव्यतिरिक्त, मुद्रा योजनेअंतर्गत ५,००० कोटी रुपयांचा पतहमी निधी आणि नवी दिल्लीत ‘युगयुगिन भारत संग्रहालय’ विकसित करण्यासाठी ३,२३० कोटी रुपयांच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे.

अश्विनी वैष्णव यांनी काय स्पष्ट केलं?

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकारांना हे स्पष्ट केलं की, मंत्रिमंडळाने P&K खतांसाठी ६२,३७० कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, पश्चिम आशियातील संकट आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मंत्री म्हणाले की, पण, सरकारने पुरेसे खत अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केलं आहे.

याबाबत पुढे सांगताना स्पष्ट केलं की, सरकारने पुरेसे खत अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण केले आहे. मोदी सरकारने भू-राजकीय अस्थिरतेपासून शेतकऱ्यांना एक सुरक्षा कवच प्रदान केले आहे. वैष्णव म्हणाले की, डीएपी म्हणजे डाय-अमोनियम फॉस्फेटची किंमत प्रति ५०-किलोग्राम पोत्यामागे १,३५० रुपये राहील असंही सांगितलं.

डीएपी आणि एनपीकेएस म्हणजेच नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश आणि सल्फर या श्रेणींसह, पी अँड के खतांवरील अनुदान २०२६-२७ च्या रब्बी हंगामासाठी मंजूर दरांवर आधारित असेल. शेतकऱ्यांना ही पोषक तत्वे परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Unemployment Rate India Decreases : देशातील बेरोजगारीच्या दरात मोठी घसरण! 5.4% वरून थेट 5.1 टक्क्यांवर; मुख्य कारणं काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्र सरकारने खतांसाठी किती रुपयांच्या सब्सिडीला मंजुरी दिली आहे?

    Ans: केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकरी हिताचा मोठा निर्णय घेत खतांच्या वितरणासाठी आणि सब्सिडीसाठी ६२,३७० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

  • Que: सब्सिडीचा मुख्य फायदा शेतकऱ्यांना कसा होईल?

    Ans: या भरभक्कम सब्सिडीमुळे शेतकऱ्यांना बाजारात रासायनिक खते स्वस्त दरात आणि वेळेवर उपलब्ध होतील, ज्यामुळे त्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.

  • Que: पीएम किसान योजनेच्या २५ व्या हप्त्याबाबत काय अपडेट आहे?

    Ans: खत सब्सिडीच्या या मोठ्या घोषणेसोबतच पीएम किसान योजनेचा आगामी २५ वा हप्ता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Pm kisan 25th installment cabinet approves 62370 crore fertilizer subsidy marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Benefit to farmers
  • Central government
  • Subsidy

संबंधित बातम्या

Buldhana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पेनटाकळी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश; पालकमंत्री मकरंद पाटलांचा निर्णय
1

Buldhana: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पेनटाकळी धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश; पालकमंत्री मकरंद पाटलांचा निर्णय

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा
2

Wardha News: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा! १.५१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये जमा

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
3

Buldhana News: दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा द्या; पालकमंत्री मकरंद जाधव पाटलांचे प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा
4

Farmer News : शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! सरकारकडून 2 मोठे निर्णय; तब्बल 2 लाख 60 हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.