Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai News : गोळीबाराने केला दारुधंद्याचा भांडाफोड, रिसॉर्टमालकावर कारवाईचा फार्स; ग्रामस्थांचा संताप

Vasai News : नालासोपारा पश्चिमेकडील कळंब येथील तुळसी रिसॉर्टमध्ये एका सरपंचाच्या पतीने केलेल्या हवेत गोळीबाराच्या घटनेने वसई-विरार किनारपट्टीवरील बेकायदा दारूविक्रीचा गोरखधंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. बार परवाना नसतानाही पर्यटकांना उघडपणे दारू पुरवली जात असल्याचे उघड झालं आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Aug 03, 2026 | 11:40 AM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • गोळीबाराने झाला दारुधंद्याचा भांडाफोड
  • रिसॉर्टचालकावर कारवाईचा फार्स
  • मद्यविक्रीचा गोरखधंदा पुन्हा उजेडात
Vasai News : नालासोपारा पश्चिमेकडील कळंब येथील तुळसी रिसॉर्टमध्ये झालेल्या हवेत गोळीबाराच्या घटनेने वसई तालुक्यात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या बेकायदा मद्यविक्रीचा गोरखधंदा पुन्हा एकदा उजेडात आला आहे. मात्र, अर्नाळा पोलिसांनी रिसॉर्टचे मालक अंकुर अनिल मेहेर यांच्याविरुद्ध कोणतीही कागदपत्रे न घेता, जागेचा वापर करू देण्यासह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ६८ चा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा नसून काही अपवाद वगळता बहुतांश प्रकार केवळ एका रिसॉर्टपुरता मर्यादित रिसॉर्टमध्ये सुरु असल्याच्या स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत.

Palghar News : बंदी काळात पर्ससीन मासेमारीस मुभा, पारंपरिक मच्छीमार आक्रमक; संघटनांकडून आंदोलनाचा पवित्रा

बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार

२९ जुलैच्या भिवंडीतील कवाडखुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी गुरव यांचे पती संदेश गुरव मित्रांसह तुळशी रिसॉर्टमध्ये आले होते. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी स्वतःकडील बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराची माहिती मिळाल्यावर अर्नाळा पोलिसांनी रिसॉर्टवर छापा टाकला. या कारवाईत बार परवाना नसतानाही ग्राहकांना मद्य पुरवले जात असल्याचे उजेडात आले आहे. मात्र, बेकायदा दारु पुरवण्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी थातूरमातूर गुन्हा दाखल करून कारवाईचा फार्स केल्याचे उजेडात आले आहे. वसई तालुक्यातील कळंब, राजोडी, नवापूर, अर्नाळा, रानगाव, भुईगाव, चिंचोटी, समुद्रकिनारी आणि फार्महाऊस परिसरातील अनेक रिसॉर्टमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यपार्ट्स सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत.

पर्यटकांना खुलेआम दारू उपलब्ध

अनेक ठिकाणी मद्यविक्रीचा कोणताही वैध परवाना नसतानाही पर्यटकांना खुलेआम दारू उपलब्ध करून दिली जाते, अशा तक्रारी आहेत. वसई हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने यापूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी तक्रारी करून बेकायदा बार आणि रिसॉर्टवर कारवाईची मागणी केली होती. पण, त्यावर कोणतीच कडक कारवाई न झाल्याने बहुतांश रिसॉर्टमध्ये खुलेआम मद्यविक्री आणि मद्यप्राशन केले जात असल्याचे दिसून येते. परवानाधारक व्यावसायिकांवर कठोर नियम लादले जात असताना बेकायदा बार मात्र राजरोस सुरू असल्याने कायद्याचे पालन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये नाराजी आहे.

समुद्रकिनाऱ्यावर रात्री टेंट उभारुन मद्यपार्त्या

राजोडी आणि कळंब समुद्रकिनाऱ्यावर रात्री टेंट उभारून मद्यपार्ट्स आयोजित केल्या जातात. काही ठिकाणी डीजे, हुक्का, रात्री उशिरापर्यंत धिंगाणा आणि सार्वजनिक शांततेचा भंग होतो. सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटक येथे येत असल्याने स्थानिक गावकऱ्यांना वाहतूक कोंडीसह इतर अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.

राजकीय संरक्षण आणि प्रशासनाचे पाठबळ

धक्कादायक बाब म्हणजे, राजकीय संरक्षण आणि काही प्रशासनाच्या पाठबळामुळे अशा रिसॉर्टवर कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून वारंवार केला जात आहे. गोळीबारासारखी गंभीर घटना घडल्यावरच पोलिसांची कारवाई होते; मात्र उत्पादन शुल्क विभाग, ग्रामपंचायत, महसूल विभाग आणि इतर यंत्रणा नियमित तपासणी का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

फार्महाऊस, पार्टी स्पॉटची संयुक्त तपासणी व्हावी

तुळशी रिसॉर्ट प्रकरणामुळे वसई तालुक्यातील रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. केवळ थातूरमातूर कारवाई करुन न प्रश्न प्रश्न सुटणार नाही, तर परवानगीशिवाय मद्यविक्री करणाऱ्या रिसॉर्ट, फार्महाऊस आणि पार्टी स्पॉटची संयुक्त तपासणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Nalasopara News : मोठ्ठा घोळ… गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विमा घोटाळा, 17 हेल्थ क्लेमद्वारे कंपनीची फसवणूक

Web Title: Vasai news nalasopara resort firing incident expose illegal liquor trade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • firing
  • Marathi News
  • palghar
  • Vasai news

संबंधित बातम्या

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…
1

Hotel Towels: हॉटेलमधून चेकआउट केल्यावर ‘त्या’ टॉवेलचं काय होतं? जाणून घ्या…

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला
2

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा
4

Venezuela Earthquake : ६,५०० मृत्यूनंतरही आशेचा किरण; २६ जणांचे प्राण वाचवणाऱ्या ‘Tsunami’ श्वानाचा पुतळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.